अश्विनी बिद्रे हत्याकांड: पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर दोषी; मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा महेश फळणीकर, कुंदन भंडारीवर ठपका संग्रहित छायाचित्र (FPJ)
नवी मुंबई

अश्विनी बिद्रे हत्याकांड: पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर दोषी; मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा महेश फळणीकर, कुंदन भंडारीवर ठपका

नवी मुंबई : तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या मुख्य आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यानेच केल्याचे सिद्ध झाल्यानंतर पनवेल सत्र न्यायालयाने शनिवारी त्याला दोषी ठरवले. अश्विनी यांच्या हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या ठपका न्यायालयाने कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्यावर ठेवला आणि भादंवि २०१ नुसार त्यांच्यावरही आरोप निश्चित केले.

Swapnil S

नवी मुंबई : तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या मुख्य आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यानेच केल्याचे सिद्ध झाल्यानंतर पनवेल सत्र न्यायालयाने शनिवारी त्याला दोषी ठरवले. अश्विनी यांच्या हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या ठपका न्यायालयाने कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्यावर ठेवला आणि भादंवि २०१ नुसार त्यांच्यावरही आरोप निश्चित केले. या हत्याकांडात कोणताही सहभाग आढळून न आल्यामुळे राजू पाटील याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कुरुंदकरसह अन्य दोन आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार हे येत्या ११ एप्रिल रोजी शिक्षा सुनावणार आहेत.

अभय कुरुंदकर

मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याने मीरा रोड येथील आपल्या घरी ११ एप्रिल २०१६ रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या केली. त्यानंतर हा खटला पनवेल जिल्हा न्यायालयात २०१९ पासून सुरू झाला. अश्विनी यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे यांच्यासह एकूण ८४ साक्षीदार या खटल्यात न्यायालयाने तपासले. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि आरोपीचे वकील विशाल भानुशाली यांचा युक्तिवाद संपल्यानंतर शनिवारी झालेल्या सुनावणीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी अश्विनी यांच्या हत्येप्रकरणी अभय कुरुंदकर याला भादंवि ३०२ नुसार दोषी ठरवले. अश्विनी यांची हत्या झाल्यानंतर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांनी त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. मृतदेहाचे तुकडे करून ते वसईच्या खाडीत टाकले होते. त्यामुळे त्यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा आरोप सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट करून दोघांनाही दोषी ठरवले.

महेश फाळणीकर

मुलीच्या उपस्थितीत सुनावणार शिक्षा

पनवेल जिल्हा न्यायालयात शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयात अश्विनी यांचा भाऊ आनंद बिद्रे, पती राजू गोरे, विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आदी उपस्थित होते.

मात्र यावेळी अश्विनी यांची मुलगी सूची आणि वडील जयकुमार बिद्रे हे उपस्थित नव्हते. या खटल्यात अश्विनी यांची हत्या झाली असली तरी खरी अन्यायाची बळी ही त्यांची मुलगी सूची ठरली आहे. तिला लहान वयात आपली आई गमवावी लागली आहे. त्यामुळे आरोपींना शिक्षा देताना तिच्या भावनांचा विचार करणे आवश्यक आहे. येत्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी सूची आणि जयकुमार यांना न्यायालयात उपस्थित ठेवावे, असे न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी सरकारी वकिलांना सांगितले.

निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात गर्दी

महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या या हत्याकांडाचा निकाल ऐकण्यासाठी पनवेल न्यायालयात शनिवारी मोठी गर्दी झाली होती. दुपारी १ वाजता न्यायाधीश यांनी के. जी. पालदेवार यांनी निकालाचे कामकाज सुरू केले. सुरुवातीला त्यांनी राजू पाटील याची निर्दोष मुक्तता केल्याचे जाहीर केले. त्यानंतर उरलेल्या आरोपींना दोषी ठरवले. आपल्यावर आरोप निश्चित झाले हे समजल्यानंतर महेश फळणीकर हा न्यायालयातच चक्कर येऊन पडला.

नाकापेक्षा मोती जड

जीवनसाखळी संरक्षित करूया!

आजचे राशिभविष्य, ३० ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत