नवी मुंबई

नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

प्रतिनिधी

गणेश नाईक यांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कमपणे सांभाळणारे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे समर्थकांसह शिंदे गटात सामील होण्याच्या तयारीत आहेत. या वृत्तामुळे नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का आहे.

गणेश नाईक यांनी २०१९ला भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला शहराचा प्रमुख चेहरा कोण? हा प्रश्न पडला होता. यावेळी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असणारे अशोक गावडे यांच्या गळ्यात नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदाची माळ पडली. आमदार गणेश नाईकांसमोर निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी गावडे यांनी मागील अनेक महिन्यांपासून संघटनाबांधणीचे काम केले. विविध उपक्रमांतर्गत नवी मुंबई शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवाढीचे काम गावडे यांनी केले; आता अशोक गावडेच पक्षाची साथ सोडणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा

ना घर, ना जमीन...पंतप्रधान मोदींकडे किती आहे संपत्ती?

मुंबई होर्डिंग घटनेतील आरोपीचं २३ गुन्हेगारी प्रकरणांमध्ये नाव, बलात्काराच्या आरोपाखाली झाली होती अटक

होर्डिंगवरून तू तू-मैं मैं; बेजबाबदारपणाचे १४ बळी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू

शरद पवार, ठाकरे यांना सहानुभूती; वळसे पाटील यांचे वक्तव्य, भुजबळांचाही दुजोरा