नवी मुंबई

तुर्भे ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग; ७ ट्रकसह जेसीबी जळून खाक , जीवितहानी नाही

या आगीमुळे एपीएमसीतील आगरोधक यंत्रणा किती कुचकामी आहे हे पुन्हा समोर आले आहे.

Swapnil S

नवी मुंबई : तुर्भे येथील ट्रक टर्मिनलमध्ये रविवारी रात्री साडेअकरा - पावणेबाराच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीवर पहाटेपर्यंत नियंत्रण मिळवले असले तरी सोमवारी दुपारपर्यंत कुलिंगचे काम सुरू होते. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून एकूण ७ ट्रक आणि १ जेसीबी वाहन पूर्णत: जळून खाक झाले आहेत. या आगीमुळे एपीएमसीतील आगरोधक यंत्रणा किती कुचकामी आहे हे पुन्हा समोर आले आहे.

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट नजीक तुर्भे सेक्टर २० येथे राज्य परिवहन मंडळाच्या भूखंडावर ट्रक टर्मिनल आहे. या ठिकाणी एपीएमसीला येणाऱ्या गाड्या मुक्कामी थांबत असतात. अशा गाड्यांतील माल उतरवून ठेवण्यासाठी तेथे एक गोडाऊन स्वरूपात माल ठेवण्यात येतो. याच गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा माल ठेवण्यात आला होता. या गोडाऊनमध्ये रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागल्याची माहिती वाशी अग्निशमन दलाला मिळाली होती. तुर्भे एमआयडीसी, नेरूळ एमआयडीसी, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ अशा ठिकाणच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. आगीत प्लास्टिक असल्याने आग विझवली तरी एखाद्या ठिणगीने पुन्हा आग पकडत होती. या परिस्थितीतून आगीवर पहाटे पर्यंत नियंत्रण मिळवण्यात आले. आगीत गोडाऊन मधील माल जळून गेला आहे. आज दुपार पर्यंत कुलिंगचे काम सुरु होते, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

आगरोधक यंत्रणेचा अभाव

या ट्रक टर्मिनल वर देशभरून आलेल्या ट्रक थांबत असतात. तसेच हजारो क्रेड्स (फळ भाजी इत्यादी वस्तू ठेवण्याची मोठी बास्केट) पडून असतात. ट्रकचालक व मदतनीस स्थानिक जेवण जमत नसल्याने आपापल्या खाद्य संस्कृतीप्रमाणे येथेच स्वयंपाक करून जेवण करत असतात. अशा ठिकाणी योग्य सोयीसुविधा असणे गरजेचे आहे. याशिवाय एवढे ट्रक उभे असून त्यात डिझेलसारखे ज्वालाग्राही पदार्थ असल्याने आगरोधक यंत्रणा सज्ज असणे गरजेचे आहे. मात्र या ठिकाणी तसे काहीही आढळून येत नाही, अशी खंत अनेक ट्रकचालकांनी बोलून दाखवली.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास