नवी मुंबई

दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने १ कोटी ९० लाखाचे सोने लंपास; ज्वेलर्स मालकाचा कामोठे पोलिसांकडून शोध सुरू

Swapnil S

नवी मुंबई : सोन्याचे दागिने बनवून देणाऱ्या मुंबईतील झवेरी बाजारातील एका ज्वेलर्स मालकाने पनवेलमधील दोन ज्वेलर्स शॉपचालकांनी दागिने बनविण्यासाठी दिलेले तब्बल १ कोटी ९० लाख रुपये किमतीचे ३ किलो ८० ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने घेऊन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. रंजितसिंग भवरसिंग सिसोदीया असे या ज्वेलर्स व्यावसायिकाचे नाव असून कामोठे पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार बाबा कोळेकर (३१) हे कामोठे भागात राहण्यास असून त्यांचे कामोठा भागात जय माताची गोल्ड शॉप नावाचे ज्वेलर्स शॉप आहे. गत ऑक्टोबर महिन्यात कोळेकर यांच्याकडे कर्नाटक-बेळगाव येथील एका ग्राहकाने सोन्याचे दागिने बनवण्यासाठी १ किलो ८० ग्रॅम वजनाचे शुद्ध सोन्याची लगड दिली होती. त्यामुळे कोळेकर यांनी मुंबईतील झवेरी बाजार येथील कोमल ज्वेलर्सचा मालक रंजित सिसोदिया याला सदर दागिने बनवून देण्याची ऑर्डर दिली होती. त्यानुसार रंजित सिसोदिया व त्याचा कामगार भरवसिंग हे दोघे कोळेकर यांच्या कामोठे येथील ज्वेलर्स शॉपमध्ये जाऊन त्यांच्याकडून १ किलो ८० ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याची लगत घेऊन गेले होते.

त्यानंतर रंजित सिसोदिया याच्यासोबत काम करणाऱ्या भवरसिंगने कोळेकर यांना संपर्क साधून रजिंत सिसोदियाच्या कोमल ज्वेलर्स या शॉपवर दिल्ली येथील डीआरआयचा (महसूल गुप्तचर संचालनालय) छापा पडल्याचे व सदर पथकाने सर्व दागिने जप्त केल्याचे सांगितले. रंजित सिसोदीयाने पनवेलमधील करंजाडे येथील सचिन वाघमोडे याच्याकडून देखील दागिने बनविण्यासाठी घेतलेले ५०० ग्रॅम वजनाचे सोने घेऊन पलायन केल्याचे समजले. अशा पद्धतीने रंजित सिसोदियाने दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने तब्बल १ कोटी ९० लाख रुपये किमतीचे ३ किलो ८० ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याचे लगड घेऊन फसवणूक केली.पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस