नवी मुंबई

बारमालकांकडून खंडणी उकळणारा जेरबंद

हितेश कुंभार मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे राहणारा असून सध्या तो कांदिवली पूर्व येथील मोरारजी मिल बिल्डिंगमध्ये राहण्यास आहे

Swapnil S

नवी मुंबई : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील बारवर शासकीय यंत्रणेकडून कारवाई करण्याची धमकी देऊन बारमालकांकडून खंडणी उकळणाऱ्या हितेश रामकृष्ण कुंभार (३३) आणि त्याच्या दोन साथीदारांना भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी अटक केली आहे. या खंडणीखोराने नेरूळमधील सर्व बारमालकांना देखील धमकावून त्यांच्याकडून देखील खंडणी उकळल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी या खंडणीखोराविरोधात गुन्हा दाखल त्याचा ताबा घेण्याची तयारी सुरू केली आहे.

हितेश कुंभार मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे राहणारा असून सध्या तो कांदिवली पूर्व येथील मोरारजी मिल बिल्डिंगमध्ये राहण्यास आहे. हितेश कुंभार मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतर परिसरातील ऑर्केस्ट्रा बार आणि सर्व्हिस बारमध्ये जाऊन त्यांचे बार बेकायदेशीरित्या चालवले जात असल्याचे सांगून संबंधित बारवर शासकीय यंत्रणेमार्फत कारवाई करण्याची धमकी देत होता. २० डिसेंबर रोजी नेरूळमधील सर्व बार सील करण्याची तसेच मंत्रालयातील ओळखीतून सरकारी यंत्रणेमार्फत त्यांच्या बारवर कारवाई करण्याची धमकी दिली होती. तसेच प्रत्येक बारकडून त्याला ३ लाख रुपये त्याला द्यावे लागतील, असे बजावले होते. शिवाय त्याने सुरुवातीला गुडविल म्हणून ११ लाख रुपये देण्याची मागणी सुद्धा केली होती. त्यावेळी घाबरलेल्या सर्व बारमालकांनी त्याला २५ हजार रुपये टोकन म्हणून दिले होते. त्यानंतर आरोपी हितेश कुंभारने अशाच पध्दतीने भिवंडीतील बारमालकांनाही मुंबईतील भाजपचा नगरसेवक असल्याचे सांगून धमकावले होते. तसेच भिवंडीतील सर्व बार चालू ठेवण्यासाठी ऑर्केस्ट्रा बारचे ५ लाख रुपये आणि सर्व्हिस बारचे ३ लाख रुपये देण्याची, दरमहा २५ हजार रुपये देण्याची देखील मागणी केली होती.

हितेश कुंभार २२ डिसेंबर रोजी पुन्हा मुंबई नाशिक मार्गालगत भिवंडी येथील बारमालकांकडून खंडणी उकळण्यासाठी गेला असताना कोनगांव पोलिसांनी सापळा लावून त्याला आणि त्याचे सहकारी देवेंद्र खुंटेकर, राकेश कुंभकर्ण या तिघांना बारमालकांकडून २७ हजार रुपयांची खंडणी घेताना रंगेहात अटक केली आहे.

भाजपचा नगरसेवक असल्याचे सांगून धमकावले

खंडणीखोर हितेश कुंभार मुंबईतील ‘भाजप'चा नगरसेवक असल्याचे अथवा मुंबईतील समाजसेवक असल्याचे सांगून तसेच त्याची मंत्रालय, महापालिका, एक्साईज डिपार्टमेंट आणि न्यूज चॅनल या सर्व ठिकाणी ओळख असल्याचे सांगून बारमालकांना धमकावत होता. तसेच त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी मागत होता.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी