उरण : जेएनपीए परिसरात प्रचंड वाहतूककोंडी; कंटेनर वाहतूक विस्कळीत; व्यापारी वर्गाला मोठा फटका 
नवी मुंबई

उरण : जेएनपीए परिसरात प्रचंड वाहतूककोंडी; कंटेनर वाहतूक विस्कळीत; व्यापारी वर्गाला मोठा फटका

जेएनपीए पोर्ट टर्मिनल आणि कंटेनर फ्रेट स्टेशनदरम्यान होणारी एक्झिम कंटेनर वाहतूक गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. तीव्र वाहतूककोंडीमुळे कंटेनर वाहतूक मंदावली असून, याचा फटका बंदर परिसरातील व्यापारी आणि आयात-निर्यात क्षेत्राला बसत आहे.

Swapnil S

उरण : जेएनपीए पोर्ट टर्मिनल आणि कंटेनर फ्रेट स्टेशनदरम्यान होणारी एक्झिम कंटेनर वाहतूक गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. तीव्र वाहतूककोंडीमुळे कंटेनर वाहतूक मंदावली असून, याचा फटका बंदर परिसरातील व्यापारी आणि आयात-निर्यात क्षेत्राला बसत आहे. शनिवार, २६ सप्टेंबरपासून सुरू झालेली ही कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर ‘कंटेनर फ्रेट स्टेशन्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने ट्रेड ॲडव्हायझरी जारी करून आयात-निर्यात क्षेत्रातील संबंधित घटकांना परिस्थितीची पूर्वकल्पना दिली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांत एनएसआयसीटी टर्मिनल परिसरातील कोंडीचा परिणाम इतर टर्मिनल्स तसेच जोडरस्त्यांवरही झाला आहे. ट्रेलर्सना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत असून, कंटेनरच्या टर्नअराउंड वेळेत मोठी वाढ झाली आहे.

सीएफएस सदस्य उपलब्ध संसाधनांचा वापर करून कामकाज सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत असले तरी रस्त्यांवरील वाहतूककोंडी ही त्यांच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे. त्यामुळे होणाऱ्या विलंबासाठी सदस्य सीएफएस जबाबदार राहणार नसल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, जेएनपीएअंतर्गत बंदरांतील कामकाज पूर्वपदावर येत असले तरी एनएसआयसीटी बंदरात मालवाहू जहाजांची संख्या वाढली आहे. होर्मुझ खाडीतील परिस्थितीमुळे काही जहाजांना आफ्रिकेला वळसा घालावा लागत असल्याने वाहतुकीस अधिक वेळ लागत आहे. त्याचा परिणाम जहाजांच्या वेळापत्रकावर झाला आहे.

एनएसआयसीटीचे सातपैकी पाच गेट सध्या बंद असल्याने कंटेनर वाहतुकीवर परिणाम झाला आहे. येत्या दोन ते चार दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल.
गिरीश थॉमस, मुख्य वरिष्ठ अधिकारी, जेएनपीए कंटेनर वाहतूक विभाग

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क न घेण्याच्या राज्य मंडळाच्या सूचना

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल