नवी मुंबई

Navi Mumbai : महापे MIDC कंपनीला भीषण आग; परिसरात काळ्या धुराचे लोट, Video व्हायरल

आग कशामुळे लागली याचा उलगडा झाला नसला तरीही शॉर्ट सर्किट किंवा फॅक्टरीतील रासायनिक प्रक्रियेमुळे आग भडकली असावी, असा पोलिस आणि अग्निशमन विभागाचा अंदाज आहे.

किशोरी घायवट-उबाळे

नवी मुंबई : महापे एमआयडीसी औद्योगिक परिसरातील बेटाकेम केमिकल्स कंपनीत शनिवारी (दि.२४) दुपारी १२.३० च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत.

आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट

प्राथमिक माहितीनुसार, आग कशामुळे लागली याचा उलगडा झाला नसला तरीही शॉर्ट सर्किट किंवा फॅक्टरीतील रासायनिक प्रक्रियेमुळे आग भडकली असावी, असा पोलिस आणि अग्निशमन विभागाचा अंदाज आहे. मात्र, आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच निश्चित कारणाची माहिती मिळू शकणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु असून शेजारील औद्योगिक युनिट्समध्ये आग पसरू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे.

काळ्या धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

माहितीनुसार, या आगीमुळे कंपनीच्या आवारातून मोठ्या प्रमाणात काळ्या धुराचे लोट दूरवर पसरल्याने परिसरातील कामगार आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमींची नोंद करण्यात आली नाही.

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai : घाटकोपरमध्ये दरड कोसळली; ६ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू, Video

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग