गणेश नाईक, विजय चौगुले (डावीकडून) 
नवी मुंबई

चौगुले यांच्या ‘प्रेशर कुकर’ने वाढले नाईकांचे प्रेशर; गणेश नाईक यांचा मार्ग खडतर, ऐरोलीत गुरू-शिष्यांच्या लढाईत कोण मारणार बाजी?

Maharashtra assembly elections 2024 : ऐरोली विधानसभा मतदारसंघात ‘भाजप’चे उमेदवार गणेश नाईक यांच्या विरोधात त्यांच्याच एकेकाळच्या दोन शिष्यांनी दिलेले आव्हान तुल्यबळ नसले तरी आमदार गणेश नाईक यांचा विजय सोपा देखील नसल्याचे चित्र ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून येत आहे.

Swapnil S

नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघात ‘भाजप’चे उमेदवार गणेश नाईक यांच्या विरोधात त्यांच्याच एकेकाळच्या दोन शिष्यांनी दिलेले आव्हान तुल्यबळ नसले तरी आमदार गणेश नाईक यांचा विजय सोपा देखील नसल्याचे चित्र ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून येत आहे. ‘शिवसेना उबाठा पक्षा'चे उमेदवार एम. के. मढवी यांनी आपल्यापरीने नाईकांना लढत दिली असली तरी ‘शिवसेना शिंदे गट'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष असलेले विजय चौगुले यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून आपल्या प्रेशर कुकर या निशाणीने गणेश नाईक यांचे प्रेशर मात्र वाढविल्याचे दिसून आले.

ऐरोली विधानसभा निवडणुकीत यापूर्वी विजय चौगुले यांना संदीप नाईक यांच्या विरोधात दोन वेळा हार पत्करावी लागली होती. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गणेश नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘भाजप’मध्ये प्रवेश केल्यामुळे नवी मुंबईत ‘भाजप’ची ताकद वाढली होती. त्यात विधानसभा निवडणुका भाजप-शिवसेना युती एकत्रित लढल्यामुळे नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर असे दोन्ही विधानसभा मतदारसंघ ‘भाजप’च्या वाट्याला गेले होते. त्यामुळे गणेश नाईक विरोधक असून सुध्दा चौगुले आणि त्यांच्या सोबतच्या शिवसैनिकांना गणेश नाईक यांचा नाइलाजास्तव प्रचार करावा लागला होता. मात्र, त्यानंतर देखील नाईक यांच्याकडून चांगली वागणूक न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या विजय चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी मुंबईत नाईक विरोध पुन्हा चालूच ठेवला. परिणामी, नाईक-चौगुले गटातील भांडणे आणि एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे प्रकार वाढल्याने एकमेकांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मजल त्यांची गेली. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत भले ‘भाजप’सोबत ‘शिंदे सेना'ची युती असली तरी नवी मुंबईतील दोन पैकी एक जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शिवसेना'ला मिळावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांचे दोन शिलेदार विजय नाहटा आणि विजय चौगुले यांनी केली होती. परंतु, बेलापूर आणि ऐरोली विधानसभेच्या दोन्ही जागा या ‘भाजप’ला गेल्यामुळे नाराज झालेल्या विजय नाहटा आणि विजय चौगुले यांनी बंडखोरी करत अपक्ष उभे राहून भाजप उमेदवारांना आव्हान निर्माण केले आहे.

ऐरोली विधानसभा मतदारसंघात असलेल्या ‘एमआयडीसीतील झोपडपट्ट्यांवर विजय चौगुले यांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणावर असल्याने दिघापासून ऐरोली, घणसोलीपर्यंत विजय चौगुले यांचे मताधिक्य अधिक असल्याचे मागच्या दोन निवडणुकांवरून स्पष्ट होत आहे. मात्र, कोपरखैरणेपासून वाशी मधील जुहूगांवपर्यंत चौगुले यांना मिळालेले मताधिक्य कमी होत जाऊन त्याचे पराभवात रूपांतर झाल्याचे दिसून आले होते. परंतु, या वेळेस विजय चौगुले यांनी प्रचारात घेतलेली आघाडी आणि त्यांना परप्रांतीयांचा मिळालेला पाठिंबा गणेश नाईक यांचे प्रेशर नक्कीच वाढवून ठेवणारे आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

कर्जमाफीवरून गदारोळ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत विरोधक आक्रमक

शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन; राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल

विधिमंडळ, सरकार, प्रशासनाचे नाते काय?

लव्ह जिहाद : भ्रम आणि वास्तव