नवी मुंबई

"घरी जेवायला येतोय..." आईला केला शेवटचा फोन; जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरने अटल सेतूवरून घेतली उडी

दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वात लांब समुद्र पूल 'अटल सेतू'वरून जे. जे. रुग्णालयातील एका ३२ वर्षीय डॉक्टरने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी (७ जुलै) रात्री ९.४५ वाजता अटल सेतू नियंत्रण कक्षाला एका मोटारचालकाने फोन करून ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिस आणि शोध-बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अद्याप डॉक्टरचा शोध लागलेला नाही.

नेहा जाधव - तांबे

दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वात लांब समुद्र पूल 'अटल सेतू'वरून जे. जे. रुग्णालयातील एका ३२ वर्षीय डॉक्टरने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी (७ जुलै) रात्री ९.४५ वाजता अटल सेतू नियंत्रण कक्षाला एका मोटारचालकाने फोन करून ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिस आणि शोध-बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अद्याप डॉक्टरचा शोध लागलेला नाही.

या डॉक्टरचे नाव डॉ. ओंकार भगवान कवितके असून, डॉक्टर ओंकार नवी मुंबईतील कळंबोली येथे राहतात. ते गेल्या सहा वर्षांपासून जे. जे. हॉस्पिटलमध्ये सेवेत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार यांनी सोमवारी रात्री ९.११ वाजता आपल्या आईला फोन करून 'जेवायला येतोय' असं सांगितलं होतं. तर रात्री ९.४५ वाजता अटल सेतू नियंत्रण कक्षाला एका मोटारचालकाने फोन करून माहिती दिली की एका व्यक्तीने पुलावर गाडी थांबवून रेलिंग ओलांडली आहे. या माहितीच्या आधारे नवी मुंबई पोलिस आणि शोध-बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी पोलिसांना Honda Amaze  (MH 46 CM 6837) कार सापडली. त्या कारमध्ये डॉक्टर ओंकार यांचा iPhone होता. त्या फोनवरून काही नंबर डायल करून आणि कॉल डिटेल्स तपासून पोलिसांनी व्यक्तीची ओळख पटवली.

सीसीटीव्ही फुटेजमध्येही डॉक्टर पुलावरून खाली उडी मारताना दिसत आहेत. त्यानंतर कोस्ट गार्ड, अग्निशमन दल, नौदल आणि पोलीस यांच्या मदतीने समुद्रात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

आत्महत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न -

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, उलवे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन रजाने यांनी सांगितले की, डॉक्टरने हे टोकाचं पाऊल का उचललं, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबीय, सहकारी आणि मित्रांची चौकशी करून या घटनेमागील कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास