प्रातिनिधिक छायाचित्र 
नवी मुंबई

‘हवाई विभागाने सोसायट्यांना दिलेल्या नोटिसा चुकीच्या’

हवाई विभागाच्या नोटीसमुळे या सोसायट्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या इमारतींना ओसी मिळाली आहे त्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या अनुषंगाने हवाई विभागाने एनआरआयमधील सोसायट्यांना इमारतीच्या उंचीबाबत नोटिसा धाडल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया चुकीची असून या सोसायट्यांवर अन्यायकारक कारवाई होऊ देणार नाही, असे माजी आमदार तथा नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी स्पष्ट केले.

हवाई विभागाच्या नोटीसमुळे या सोसायट्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या इमारतींना ओसी मिळाली आहे त्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. त्या सुरक्षित आहेत. वास्तविक हवाई विभागाने महापालिकेशी पत्रव्यवहार करायला पाहिजे होता, सोसायट्यांबरोबर नाही. या संदर्भात आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा केली असून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याबरोबर देखील बोलणार आहे. वेळ पडल्यास हवाई उड्डाण मंत्री यांच्याशी देखील बोलणार असल्याचे संदीप नाईक यांनी सांगितले.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी