Navi Mumbai : एपीएमसीत ४३ हजारांची लाच घेताना दोघे ताब्यात 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
नवी मुंबई

Navi Mumbai : एपीएमसीत ४३ हजारांची लाच घेताना दोघे ताब्यात

एपीएमसी फळ मार्केटमधील किराणा बाजार व दुकाने मंडळाच्या कार्यालयात माथाडी कामगाराच्या रजिस्टर पावतीवर सही करण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ४३ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन जणांना ताब्यात घेतले.

Swapnil S

नवी मुंबई : एपीएमसी फळ मार्केटमधील किराणा बाजार व दुकाने मंडळाच्या कार्यालयात माथाडी कामगाराच्या रजिस्टर पावतीवर सही करण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ४३ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन जणांना ताब्यात घेतले.

या प्रकरणात लोकसेवक भरत राजाराम कदम, कामिक प्रभारी निरीक्षक आणि खासगी सुरक्षा रक्षक विजय नारायण पवार (३२) यांचा समावेश आहे. तक्रारदाराने माथाडी कामगार म्हणून नियुक्तीसाठी अर्ज केला. त्यानंतर सही करून देण्यासाठी पवार यांनी स्वतःसाठी ५ हजार आणि कदम यांच्यासाठी ५० हजार, अशी एकूण ५५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

एसीबीने याबाबत पडताळणी केल्यानंतर सापळा रचला. कार्यालयातील केबिनमध्ये पंचासमक्ष ४३ हजार रुपये स्वीकारताना दोघांना एसीबी पथकाने ताब्यात घेतले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Pune : आंदोलकांवर कारवाईचा बडगा! MPSC विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात

बदलापूरच्या रस्त्यावर थुंकल्यास ५०० रुपये दंड; नियमांचे पालन करा, नगर परिषदेचे आवाहन

Mumbai : सत्कार केटरर्ससह ८ उपाहारगृहांचे परवाने निलंबित; अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या उल्लंघनेनंतर FDA ची कारवाई

Mumbai : न्यायालयाच्या कामकाजाचे गुपचूप रेकॉर्डिंग करणे पडले महागात

Ulhasnagar : महापालिकेतील सत्तासंघर्ष थेट पोलिसांच्या दारात; शिवसेना-भाजपच्या दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल