प्रातिनिधिक छायाचित्र  
नवी मुंबई

Navi Mumbai : बनावट शिक्क्यांच्या आधारे दुबईला जाण्याचा प्रयत्न फसला; अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाचा बनावट कागदपत्रांवरून प्रवास करण्याचा डाव फसला आहे. इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून, सीबीडी बेलापूरमधील एका शिपिंग एजन्सीने बनावट साइन ऑफ शिक्के पुरवून हा बनाव केल्याचे समोर आले आहे.

Swapnil S

नवी मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाचा बनावट कागदपत्रांवरून प्रवास करण्याचा डाव फसला आहे. इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून, सीबीडी बेलापूरमधील एका शिपिंग एजन्सीने बनावट साइन ऑफ शिक्के पुरवून हा बनाव केल्याचे समोर आले आहे.

रायगड जिल्ह्यातील गणेश सचिन कळंबे (वय २४) हा युवक १२ सप्टेंबर रोजी सकाळी इंडिगो फ्लाइटने दुबईला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर आला होता. त्याच्या कागदपत्रांची इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली असता, त्याच्या सीडीसी (सिमन बुक) मध्ये एमव्ही मारसा नेपचुन या जहाजावर २५ नोव्हेंबर २०२३ रोजी साइन ऑन व १६ मार्च २०२५ रोजी साइन ऑफ असल्याचे नोंद होते. मात्र, अधिकृत आयव्हीएफआरटी प्रणालीतील तपासणीत साइन ऑफ दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ असल्याचे आढळून आले.

मार्च २०२५ मध्ये मिश्रा याच्या कार्यालयात जाऊन कळंबे याने त्याच्या सीडीसीवर बनावट साइन ऑफ शिक्के घेतल्याचे तसेच हे शिक्के अधिकृत वेबसाईटवर अपडेट करून देण्याच्या मोबदल्यात २५ हजार रुपये दिल्याचे त्याने सांगितले.

जहाजावर काम मिळवण्यासाठी घातला घाट

तपासणीदरम्यान संशय वाढल्याने गणेश कळंबे याची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने सांगितले की, जहाज कंपनी सस्पेंड झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना इराकमधील बंदर अब्बास येथे उतरवण्यात आले होते. तो अधिकृत साइन ऑफ शिक्के न घेता थेट मुंबईला परतला होता. परंतु पुन्हा जहाजावर काम मिळवण्यासाठी सीडीसीमध्ये साइन ऑफ नोंद आवश्यक असल्याने त्याने बेलापूर येथील विक्रम शिपिंग एजन्सीच्या एजंट विक्रम मिश्रा याच्याशी संपर्क साधला.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

पीडितांकडे न्यायालयाचे दुर्लक्ष नको; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान