Navi Mumbai : दहशतवाद्याच्या नावाने पोलिसांना 'फेक कॉल'; खोटी अफवा पसरवणारा आरोपी जेरबंद 
नवी मुंबई

Navi Mumbai : दहशतवाद्याच्या नावाने पोलिसांना 'फेक कॉल'; खोटी अफवा पसरवणारा आरोपी जेरबंद

बॉम्बस्फोट घडवून आणण्याची खोटी धमकी देत पोलिस दलाची दिशाभूल करणाऱ्या एका व्यक्तीला एपीएमसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने तसेच भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा बनावट कॉल करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

Swapnil S

नवी मुंबई : बॉम्बस्फोट घडवून आणण्याची खोटी धमकी देत पोलिस दलाची दिशाभूल करणाऱ्या एका व्यक्तीला एपीएमसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने तसेच भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा बनावट कॉल करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

मंगळवारी दुपारच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून, “मी दहशतवादी बोलत आहे आणि मुंबईत बॉम्ब उडवणार आहे,” अशी धमकी दिली व तत्काळ फोन कट केला, या धमकीनंतर पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली.पोलिसांनी तात्काळ तांत्रिक तपास सुरू करून संबंधित मोबाईल क्रमांकाचा माग काढला. बीट मार्शल क्रमांक-१ कडील एम.डी. मशीनच्या सहाय्याने तपास केल्यानंतर हा कॉल वाशी सेक्टर-१९ येथील ‘विसावा हॉटेल’ परिसरातून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर एपीएमसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत तुफान नुरल शेख (४६) याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने दिलेली माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट झाले.

प्राथमिक तपासात कोणतेही ठोस कारण नसताना आरोपीने हा धमकीचा कॉल केल्याचे समोर आले आहे. आरोपी हा मूळचा पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून सध्या एपीएमसी मार्केट परिसरात बिगारी काम करून उदरनिर्वाह करत असल्याचे तपासात आढळले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध शासन व पोलीस दलाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Mumbai : गोरेगाव-मुलुंड २० मिनिटांत; जीएमएलआर प्रकल्पात ‘तुळशी’ खोदणार बोगदा, नॅशनल पार्कखाली भूमिगत बोगदा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : मुख्य आरोपी सचिन अंदूरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती, HC चा मोठा निर्णय

बापरे! मध्यान्ह भोजनात मिठाऐवजी चक्क डिटर्जंट? जेवणानंतर २४ हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल, VIDEO

संतापजनक! पालघरमध्ये १० वर्षांच्या मुलीवर ५० वर्षीय काकाकडून अत्याचार; FIR नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ? कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस