Navi Mumbai : हिट अँड रन दुर्घटनेत २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू 
नवी मुंबई

Navi Mumbai : हिट अँड रन दुर्घटनेत २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू

महापे येथील एका आयटी कंपनीत रात्रपाळी संपवून स्कुटीवरून डोंबिवली येथील घरी जात असलेल्या २१ वर्षीय तरुणीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू -झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे महापे उड्डाणपुलाखाली घडली.

Swapnil S

नवी मुंबई : महापे येथील एका आयटी कंपनीत रात्रपाळी संपवून स्कुटीवरून डोंबिवली येथील घरी जात असलेल्या २१ वर्षीय तरुणीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू -झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे महापे उड्डाणपुलाखाली घडली.

अपघातानंतर वाहनचालकाने जखमी तरुणीला कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त होत आहे. मृत तरुणीचे नाव जिया शिवकुमार सिंह (२१) असे असून ती डोंबिवली (पूर्व) येथील लोढा हेवन परिसरात वास्तव्यास होती. जिया महापे येथील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी नेहमीप्रमाणे रात्रपाळीची शिफ्ट संपल्यानंतर जिया पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास तिच्या स्कुटीने ठाणे-बेलापूर मार्गावरून डोंबिवलीकडे निघाली होती. महापे येथील उड्डाणपुलाखाली ठाणे लेनकडे जाणाऱ्या मार्गावर तिची स्कुटी आली असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली.

Instamart वरून आता एलपीजी सिलिंडरची होम डिलिव्हरी; स्विगीची HPCL सोबत भागीदारी, कनेक्शनशिवाय करता येणार ऑर्डर

Video : नोएडात ई-बाईक चार्जिंगवेळी भीषण आग; दोघांचा गुदमरून मृत्यू, ५० कुटुंबांची सुटका

Mumbai : एसी लोकलमधील तांत्रिक बिघाडानंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रोटोकॉल लागू

माळशेज घाटात सोसाट्याचा वारा; दुचाकीही डगमगली, VIDEO पाहून नेटकरी थक्क

Mumbai : कौटुंबिक वादातून पत्नीची निर्घृण हत्या; ओशिवरा पोलीस ठाण्याच्या शेजारीच थरार