मंगळवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी पाहणी केली. 
नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळ दृष्टीक्षेपात! ऑक्टोबरमध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीत 'सुखोई'ची चाचणी, ६ महिन्यांत पहिले उड्डाण?

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावर लवकरच पंतप्रधान यांच्या उपस्थितीत हवाई दलाच्या सुखोई विमानाची चाचणी करण्यात येणार आहे. ५ ऑक्टोबरच्या आसपास ही चाचणी होणार असून या पूर्वीच सिग्नल चाचणी यशस्वीरित्या पार पडलेली आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय विमानतळ दृष्टीक्षेपात आले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सिडको भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

मार्च महिन्यापासून देशांतर्गत आणि जून महिन्यात आंतरराष्ट्रीय विमाने या विमानतळावरील धावपट्टीवरून उडावीत, असे नियोजन अदानी समूह आणि सिडको मंडळाचे आहे. ११६० हेक्टर क्षेत्रावर हे देशातील पहिले ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असून दोन टप्प्यांमध्ये त्याची उभारणी होत आहे. प्रती वर्ष ९० दशलक्ष प्रवासी आणि अडीच लाख मेट्रीक टन मालवाहतूक या विमानतळावरून होऊ शकेल. विमानांच्या स्वतंत्र प्रवर्तानाकरिता दोन समांतर धावपट्ट्या आणि पूर्ण लांबीचे पंधरा - पंधरा मीटर रुंदीच्या प्रशस्त दोन समांतर टॅक्सी येजा करण्यासाठी मार्गिका असणार आहेत. त्यामुळे विमानतळ ते विमान हा प्रवास तातडीचा होईल. मुंबई विमानतळ उभारणीवेळी झालेल्या चुकांची दुरुस्ती येथे करण्यात आली आहे.

सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा महत्वाकांक्षी आणि राज्याला वेगळी ओळख करून देणारा तसेच राष्ट्रीय दृष्टीकोनातून महत्त्वाचा प्रकल्प आहे. नवी मुंबईसह राज्याच्या आणि देशाच्या विकासाकरिता हा प्रकल्प योगदान देणार आहे. प्रकल्पाच्या कामाची प्रगती समाधानकारक आहे. प्रकल्पाच्या गतिमान अंमलबजावणीकरिता कालमर्यादेमध्ये कामे पूर्ण करण्याचे संबंधितांना निर्देशही देण्यात आले आहेत. यामुळे लवकरच येथून विमानाचे उड्डाण होणार आहे. - संजय शिरसाट, अध्यक्ष, सिडको मंडळ

अखेरचा 'टाटा' ! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

देशाचे अनमोल 'रतन' हरपले! टाटा समूहाला जागतिक स्तरावर नेणारे नेतृत्व, एका क्लीकवर बघा सगळा प्रवास

Pune Porsche Car Accident: बाल न्याय मंडळाचे 'ते' दोन सदस्य बडतर्फ

लाल वादळ थंडावले...राफेल नदालने केली निवृत्तीची घोषणा, डेव्हिस चषक ठरणार अखेरची स्पर्धा

शिल्पा शेट्टी, राज कुंद्राला तूर्तास दिलासा; कारवाई करणार नसल्याची ED ची हायकोर्टात हमी