प्रातिनिधिक छायाचित्र 
नवी मुंबई

Navi Mumbai : डीपीशेजारी कचरा टाकू नका, गाड्या पार्क करू नका; महावितरणचे आवाहन

कोपरखैरणे परिसरात महावितरणच्या वीज यंत्रणेजवळ कचरा टाकणे तसेच वाहन पार्किंग वाढल्यामुळे गंभीर अडचणी निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फीडर पिलर (डीपी) शेजारी कचरा टाकू नये आणि वाहने उभी करू नयेत, असे आवाहन महावितरण विभागाने नागरिकांना केले आहे.

Swapnil S

नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात महावितरणच्या वीज यंत्रणेजवळ कचरा टाकणे तसेच वाहन पार्किंग वाढल्यामुळे गंभीर अडचणी निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फीडर पिलर (डीपी) शेजारी कचरा टाकू नये आणि वाहने उभी करू नयेत, असे आवाहन महावितरण विभागाने नागरिकांना केले आहे. कोपरखैरणेतील सेक्टर १५, १६, १७, १८ आणि १९ या भागांमध्ये फीडर पिलर (लाल डीपी) तसेच - भूमिगत केबलजवळ मोठ्या प्रमाणात अतिक्रमण, कचरा टाकणे आणि वाहन पार्किंग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे वीज यंत्रणेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढत आहे.

काही वर्षांपूर्वी कोपरखैरणे खाडी परिसरातील एका डीपी शेजारी साचलेल्या कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली होती. फीडरमधून उडणाऱ्या ठिणग्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सुरक्षा तारा बसवूनही काहीजण त्यातून कचरा टाकत असल्याचेही आढळले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महावितरणने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

फीडर पिलर (लाल डीपी) जवळ कोणतेही वाहन उभे करू नये, डीपीपासून किमान २ मीटर पुढे व मागे मोकळी जागा ठेवावी, डीपीवर किंवा आसपास पोस्टर, जाहिराती अथवा कोणतेही साहित्य ठेवू नये, फेरीवाले व भाजी विक्रेत्यांनी डीपी परिसरात अतिक्रमण करू नये, ज्या ठिकाणी भूमिगत केबल आहे त्या भागात वाहन पार्क करू नये तसेच वीज यंत्रणेच्या सुरक्षिततेस बाधा पोहोचेल असे कोणतेही कृत्य टाळावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. वरील सूचनांचे पालन केल्यास संभाव्य अपघात टाळता येतील आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होईल, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

Mumbai : चेंबूर बस दुर्घटनेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; अन्य चार विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

Mumbai : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; काही विद्यार्थी जखमी, बचावकार्य सुरू, Video

आता मोबाईल नंबरशिवाय करता येणार चॅट; WhatsApp चं नवं Username फीचर, जाणून घ्या डिटेल्स

सचिन अहिर यांनी पक्ष सोडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले - "जे कधीच नव्हते आमचे...

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश, उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल