नवी मुंबई

Navi Mumbai : पोलीस उपनिरीक्षकाला ५० हजारांची लाच घेताना अटक, ACB ने रंगेहाथ पकडले

तक्रारदाराच्या वडिलांविरोधात जमिनीच्या सातबारा नोंदीशी संबंधित गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात गंभीर कलमे वाढवून अटक होईल, अशी भीती दाखवून वारंवार लाचेची मागणी.

Swapnil S

पनवेल : पनवेल शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सचिन वायकरला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल येथे केली.

तक्रारदाराच्या वडिलांविरोधात जमिनीच्या सातबारा नोंदीशी संबंधित गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात गंभीर कलमे वाढवून अटक होईल, अशी भीती दाखवून उपनिरीक्षक वायकरने सुरुवातीला १ लाख रुपयांची लाच मागितली, मात्र तडजोडीनंतर ५० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले.

संबंधित गुन्हा दाखल झाल्यावर उपनिरीक्षक वायकर याने तपासादरम्यान संशयीत आरोपींकडून वेळोवेळी लाखो रुपये उकळले होते. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर उपअधीक्षक सरिता भोसले आणि पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून कारवाई केली. सोमवारी रात्री १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उपनिरीक्षक वायकर यांनी आपल्या खासगी मोटारीतून खासगी व्यक्ती रविंद्र उर्फ सचिन सुभाष बुट्टे (रा. करंजाडे) याच्या माध्यमातून ही रक्कम स्वीकारली. लगेचच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

अतिवृष्टीचा इशारा! राज्यातील ८ जिल्ह्यांसाठी आज 'रेड अलर्ट'; मुंबई ठाण्यासह ६ जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'

भारत-ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार; करारामुळे ९९ टक्के भारतीय मालाला टॅरिफमधून मिळणार सवलत

भारतातून नोकरभरती करू नका! ट्रम्प यांचा अमेरिकन टेक कंपन्यांना इशारा

मुंबई बॉम्बस्फोट खटला; निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, सुटका झालेले आरोपी मात्र तुरूंगाबाहेरच राहणार

गणेश विसर्जनाचा तिढा सुटला; सहा फुटांपर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; मोठ्या मूर्तींचे विसर्जन समुद्रात