नवी मुंबईत मानवी तस्करीचे रॅकेट उघड  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
नवी मुंबई

नवी मुंबईत मानवी तस्करीचे रॅकेट उघड

नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तळोजा परिसरात कारवाई करत एका आंतरराष्ट्रीय देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बांगलादेशातून कामाचे आमिष दाखवून आणलेल्या तरुणींना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीचा शोध आता पोलिसांनी युद्धपातळीवर सुरू केला आहे. या प्रकरणात एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली असून दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तळोजा परिसरात कारवाई करत एका आंतरराष्ट्रीय देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बांगलादेशातून कामाचे आमिष दाखवून आणलेल्या तरुणींना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या टोळीचा शोध आता पोलिसांनी युद्धपातळीवर सुरू केला आहे. या प्रकरणात एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली असून दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

तळोजा परिसरातील घोटगाव येथे काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे व त्यांच्या पथकाने १५ मार्च रोजी अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी नोयोन टोकीबोर शेख ऊर्फ आर्यन याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत दोन पीडित तरुणीही आढळल्या. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही तरुणींची कसून चौकशी केली असता, या प्रकरणातील धक्कादायक वास्तव समोर आले.

यातील दोन्ही पीडित तरुणी आणि मुख्य आरोपी हे सर्वजण मूळचे बांगलादेशी आहेत. यातील लोया ऊर्फ स्वाती, तिचा पती सलमान या आरोपी दांपत्याने त्यातील एका तरुणीला चांगले काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून बांगलादेशात भारतात आणले होते. मात्र, भारतात आल्यानंतर तिला धमकावून आणि जबरदस्तीने वेश्याव्यवसायात जुंपले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी दाम्पत्याने या तरुणींना केवळ नवी मुंबईतच नव्हे, तर सातारा, लोणावळा, नाशिक, जालना आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांत ग्राहकांकडे वेश्यागमनाकडे पाठविल्याचे तसेच या व्यवसायातून मिळणारा सर्व पैसा आरोपींनी स्वत: हडप केल्याचे तपासात आढळून आले आहे.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण