नवी मुंबई

३६६.८० कोटींचे करसंकलन; नवी मुंबई महापालिकाकडून १ जुलैपासून विलंब दंड लागू

नवी मुंबई महापालिका मालमत्ताकर विभागाने सन २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीमध्ये ३६६.८० कोटींचे करसंकलन करून करसंकलनामध्ये महापालिकेच्या इतिहासामध्ये विक्रमी नोंद केली आहे. नवी मुंबई महापालिकेने नागरिकाभिमुख उपक्रम राबविल्यामुळे आणि करसंकलनासाठी विविध पुढाकार घेतल्याने संकलनामध्ये विक्रमी वाढ झाली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मालमत्ताकर विभागाने सन २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीमध्ये ३६६.८० कोटींचे करसंकलन करून करसंकलनामध्ये महापालिकेच्या इतिहासामध्ये विक्रमी नोंद केली आहे. नवी मुंबई महापालिकेने नागरिकाभिमुख उपक्रम राबविल्यामुळे आणि करसंकलनासाठी विविध पुढाकार घेतल्याने संकलनामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. यामध्ये बचतगटांच्या महिला, मालमत्ताकर विभागाचे सर्व स्तरावरील अधिकारा-कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे शहरातील जागरुक करदाते यांच्यामुळे करसंकलनाचा सदर विक्रम साध्य झाला असून ते सर्वांचे यश असल्याचे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी करदात्या नागरिकांचे आभार मानले आहेत.

आगामी काळामध्ये थकबाकीदारांना मालमत्ताकर भरण्याच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी महापालिकेने आता १ जुलैपासून विलंब दंड (शास्ती) लागू करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, ज्यांनी पहिल्या तिमाहीमध्ये आपल्या कराचा भरणा केला नाही अशा थकबाकीदारांवर १ जुलैपासून प्रतिमहिना वाढणारा २ टक्के विलंब दंड आकारण्यास सुरुवात होणार आहे.

शहराच्या विकासामध्ये प्रत्येक करदात्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी भरलेल्या करातूनच शहराचा विकास होतो. शहराच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाचा वेळेवर भरलेला कर विश्वासाचा भाग आहे. पहिल्या तिमाहीत झालेल्या विक्रमी करसंकलनातून नवी मुंबईकरांनी दाखवलेली जबाबदारी निश्चितच उल्लेखनीय आहे. मात्र, आता नियमानुसार १ जुलैपासून विलंब दंड लागू होत आहे. त्यामुळे अनावश्यक दंड टाळण्यासाठी नागरिकांनी तत्काळ कर भरून विकासाच्या वाटचालीत भागीदार व्हावे, असे आवाहन नवी मुंबईकर मालमत्ताधारकांना करण्यात येत आहे.
डॉ. कैलास शिंदे, आयुक्त नवी मुंबई महापालिका

असे झाले कर संकलन

  • १,००,५८७ करदात्यांकडून ३६६.६० कोटी करभरणा

  • ऑनलाइन पद्धतीने २२० कोटींचा कर (६६ टक्के)

  • तिमाहीच्या शेवटच्या दिवशी तब्बल ९०.८४ कोटी करसंकलन

  • नेरूळ वॉर्डमधून सर्वाधिक ७४.१३ कोटी रुपये कर रक्कम

  • तब्बल ९९,७०३ करदात्यांना १० टक्के सवलतीचा लाभ

मालमत्ता प्रकार टक्केवारी

निवासी मालमत्ता - ३३ टक्के

औद्योगिक मालमत्ता - ३३ टक्के

व्यावयासिक मालमत्ता - ३ टक्के

मिश्र आणि इतर मालमत्ता - ११ टक्के

१२०० कोटी रुपयांचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ‘नमुंमपा'ने मालमत्ता करवसुलीचे १२०० कोटी रुपयांचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. चालू वर्षात बचतगटांच्या महिलांद्वारे बिलांचे घरपोच वाटप, मोबाईल ॲप्लिकेशनच्या सहाय्याने मालमत्ताकर भरण्यासाठी डिजिटल पद्धतीचा स्वीकार, मालमत्ताकर बिल व्हॉट‌्सॲपवर मिळविण्यासाठी व्हॉट‌्सॲप चॅटबॉट आणि मालमत्ताकर बिलातील सामान्य करावरील १० टक्के सवलत योजनेचा लाभ, असे अभिनव उपक्रम राबवण्यात आले आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली