नवी मुंबई

नवी मुंबई: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

गत शनिवारी दुपारच्या सुमारास अनिल प्रसाद हा सदर बांधकामाच्या साइटवर सेंट्रिंगचे काम करत असताना त्याचा तोल गेल्याने तो ३० फुटावरून खाली पडला.

Swapnil S

नवी मुंबई : वाशी सेक्टर-२ मधील मेघराज मेघदूत थिएटरच्या जागेवर बांधकाम सुरू असलेल्या वन अक्षर भगवती कन्स्ट्रक्शनच्या साइटवर सेंट्रिंगचे काम करणाऱ्या कामगाराचा ३० फुटावरून पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी वाशी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

या दुर्घटनेत मृत कामगाराचे नाव अनिल सुराली प्रसाद (४९) असे असून तो उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी आहे. सध्या तो वन अक्षर भगवती कन्स्ट्रक्शनच्या वतीने वाशी सेक्टर-२ मधील मेघराज मेघदूत थिएटरच्या जागेवर सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन साइटवर काम करत होता.

गत शनिवारी दुपारच्या सुमारास अनिल प्रसाद हा सदर बांधकामाच्या साइटवर सेंट्रिंगचे काम करत असताना त्याचा तोल गेल्याने तो ३० फुटावरून खाली पडला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या अनिल प्रसादला तत्काळ वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.

देशात सर्वात कोरडा मान्सून; एल-निनोचा फटका; सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

Mumbai : फेरीवाल्यांवरील कारवाईत समन्वयाचा अभाव; विधी समितीत हरकतीचा मुद्दा

Mumbai : खारमधील पुनर्विकासाला मंजुरी; रामकृष्णनगरच्या रहिवाशांना मिळणार मोठी घरे

Mumbai : चॉकलेटपासून साकारला नक्षीदार बाप्पा; ४ फूट उंच, तर ७५ किलो वजनाची मूर्ती

उद्घाटनापूर्वीच श्रेयाची 'लढाई'; जिजाऊ प्रवेशद्वारावर पालकमंत्र्यांचे नाव; मराठा समाजासह विविध संघटनांचा विरोध, नाव हटविण्याची मागणी