नवी मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांचा अखेर शिंदे गटात प्रवेश

देवांग भागवत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आणि माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी गुरुवारी १५ सप्टेंबर रोजी शिंदे गटात प्रवेश केला. मागील अनेक दिवसांपासून ते शिंदे गटात जातील अशा चर्चा होत्या. अखेरीस त्यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
गावडेंसह त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका निर्मला गावडे, मुलगी आणि माजी नगरसेविका सपना गावडे, सानपाड्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे, कोपरखैरणेचे तालुकाध्यक्ष मोहन पाडळे, घणसोलीचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, सीबीडी बेलापूरचे तालुकाध्यक्ष अरुण कांबळे, रबाळेचे तालुकाध्यक्ष महेश बिराजदार, तुर्भेचे तालुकाध्यक्ष नियाज शेख आणि अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गावडे शिंदे गटात गेल्याने नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का असल्याचे बोलले जात आहे.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम