नवी मुंबई

अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेला नायजेरियन अटकेत; ५ लाख ५० हजार किमतीचे मेफेड्रॉन जप्त

Swapnil S

नवी मुंबई : खारघर सेक्टर-३५ मध्ये एमडी हे अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या एका नायजेरियन नागरिकाला अमली पदार्थविरोधी पथकाने गत शुक्रवारी सापळा रचून जेरबंद केले आहे. अब्दुल रझाक हसन (३४) असे या नायजेरियन नागरिकाचे नाव असून अमली पदार्थविरोधी पथकाने त्याच्याजवळ असलेले ५५ ग्रॅम वजनाचे ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रॉन) हे अमली पदार्थ जप्त केले आहे.

खारघर सेक्टर-३५ मधील सावन रेसिडेन्सीसमोरील रोडवर एक नायजेरियन नागरिक अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक मोरे व त्यांच्या पथकाने गत शुक्रवारी सापळा रचण्यात आला होता.

रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास अब्दुल रझाक हसन हा नायजेरियन नागरिक त्या भागात संशयास्पदरीत्या आल्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकाने त्याची धरपकड केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ प्लास्टिक पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाचे पारदर्शक स्फटिकासारखे पावडर स्वरूपात असलेले एमडी (मेफेड्रॉन) हे अमली पदार्थ आढळून आले. याप्रकरणी अब्दुल हसनविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईत नायजेरियन नागरिकांच्या कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

निवडणुकीनंतरही संघर्षमय राजकारण

ऑनलाईन गेमची उलाढाल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

ठाणे, कोकण, मराठवाड्यात अवकाळीचा कहर सुरूच

‘इंडिया’ आघाडीला बाहेरून पाठिंबा देणार,ममता बॅनर्जी यांची घोषणा