नवी मुंबई

अटल सेतूवर बेस्टनंतर आता एनएमएमटी देखील धावणार, 'या' क्रमांकाची बस सोडण्याचा निर्णय

Swapnil S

नवी मुंबई : बेस्टपाठोपाठ नवी मुंबई महानगरपालिकेची एनएमएमटी बस देखील एमटीएचएल (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) अटल सेतूवरून धावणार आहे. एनएमएमटी शासनाने नेरूळ ते मंत्रालय ही ११५ क्रमांकाची वातानुकूलित बस एमटीएचएल मार्गे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या मार्गावरून ही बस सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नवी मुंबईकरांना देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलावरून प्रवास करता येणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबई ते मुंबई असा प्रवास करता यावा, यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने नेरूळ ते मंत्रालय ही एनएमएमटी बस सेवा एमटीएचएल मार्गे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ११५ क्रमांकाची वातानुकूलित बस सोडण्यात येणार असून, ही बस खारकोपर ते मंत्रालयापर्यंत चालवली जात असून, रहिवाशांच्या मागणीनुसार, ही सेवा आता नेरूळ येथून सुरू होईल आणि एमटीएचएल मार्गे जाईल. नेरूळ ते मंत्रालय या ५२ किमीच्या प्रवासासाठी सध्याचे भाडे ९० ठेवण्यात आले आहे. सध्या या मार्गावरून सकाळी २ आणि सायंकाळी २ अशा चार वातानुकूलित इलेक्ट्रिक बस फेऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, गत १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अटल सेतू पुलावरून एनएमएमटीची बससेवा सुरू होणार असल्याने नागरिकांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. चारचाकी वाहन नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अटल सेतूवरून जाता येत नव्हते. एनएमएमटी बस सेवेमुळे आता सर्वसामान्यांना आपल्या कुटुंबाला घेऊन भारतातील सर्वात लांब सागरी पुलावरून प्रवासाचा अनुभव घेता येणार असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

एनएमएमटीची नेरूळ ते मंत्रालय ही बस सेवा नव्यानेच सुरू झालेल्या अटल सेतूवरून लवकरच धावणार आहे. या बसच्या तिकीटदरात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ केलेली नाही. प्रत्येक एसी बसमध्ये सध्या लागू असलेले तिकीटदरच आकारण्यात येणार आहे. - योगेश कडुसकर,

व्यवस्थापक, नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभाग

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

Marathi Serial: लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' प्रेक्षकांपुढे येणार नवीन अवतारात!