एनएमएमटी बस संग्रहित छायाचित्र
नवी मुंबई

लज्जास्पद! NMMT च्या धावत्या बसमध्ये जोडपं 'नको त्या अवस्थेत'; बाईकस्वाराने लपून Video बनवला, कारवाईचा बडगा मात्र कंडक्टरवर

पनवेलहून कल्याणकडे जाणाऱ्या या बसमध्ये फारसे प्रवासी नव्हते. २२ सेकंदांची क्लिप एका दुचाकीस्वाराने शूट केली असून, त्याने बसच्या खिडकीतून हे दृश्य पाहिल्यानंतर व्हिडीओ वरिष्ठ NMMC अधिकाऱ्यांकडे पाठवला

Krantee V. Kale

नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) एका वातानुकूलित (AC) बसमध्ये 'नको ते कृत्य' करणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याचा फटका मात्र बसच्या कंडक्टरला बसलाय. बस कंडक्टरवर विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे.

कंडक्टर सतर्क नव्हता म्हणून...

रविवारी सायंकाळी चक्क बसच्या मागील सीटवर एका जोडप्याने शारीरीक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार घडला होता. नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "कंडक्टर पुरेसा सतर्क नव्हता आणि त्याने वेळेत योग्य ती कारवाई केली नाही, त्यामुळे त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे." तथापि, महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

पनवेलहून कल्याणकडे जाणाऱ्या बसमधील घटना

संबंधित कंडक्टरला लेखी स्पष्टीकरण मागवण्यात आले असून, त्याने जोडप्याला रोखण्यासाठी काहीच का केले नाही याचे उत्तर विचारले गेले आहे, असे RTI कार्यकर्ते अनर्जित चौहान यांनी सांगितले. "ही २२ सेकंदांची क्लिप एका दुचाकीस्वाराने शूट केली असून, त्याने बसच्या खिडकीतून हे दृश्य पाहिल्यानंतर व्हिडीओ वरिष्ठ NMMC अधिकाऱ्यांकडे पाठवला," असे चौहान यांनी सांगितले. “पनवेलहून कल्याणकडे जाणाऱ्या या बसमध्ये फारसे प्रवासी नव्हते. वाहतूक जाममुळे बस संथ झाल्यावरच हा व्हिडीओ काढण्यात आला,” असे त्यांनी सांगितले.

भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्यास तीन महिने तुरुंगवास किंवा रु. १,००० पर्यंत दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. मात्र, बातमी प्रसिद्ध होईपर्यंतही महापालिकेने पोलिसांकडे कोणतीही अधिकृत तक्रार दिलेली नाही.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती