नवी मुंबई

नवी मुंबईत शिंदेंचा ‘टांगा पलटी’; गणेश नाईकांनी 'करून दाखवलं!'

या निवडणुकीत भाजप ६६, शिंदे गट ४१, शिवसेना (ठाकरे गट) २, मनसे १ आणि अपक्ष १ असे नगरसेवक निवडून आले. निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात प्रवेश केलेल्या अनेक प्रस्थापित उमेदवारांना मतदारांनी स्पष्ट नकार दिला.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेची अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेली निवडणूक अखेर वनमंत्री गणेश नाईक यांच्या वर्चस्वाने गाजली. शिवसेना (शिंदे गट) प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या निवडणुकीत नाईकांनी अक्षरशः धोबीपछाड दिली. आव्हान दिल्याप्रमाणे नाईकांनी शिंदे गटाचा ‘टांगा पलटी’ केला असून, जनतेने शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवले.

या निवडणुकीत भाजप ६६, शिंदे गट ४१, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २, मनसे १ आणि अपक्ष १ असे नगरसेवक निवडून आले. निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात प्रवेश केलेल्या अनेक प्रस्थापित उमेदवारांना मतदारांनी स्पष्ट नकार दिला.

निवडणूक प्रचारादरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका करत, “मला हलक्यात घेऊ नका. भाजपच्या नेतृत्वाने परवानगी दिली तर शिंदेंचा टांगा पलटी करून घोडे फरार नाही, तर बेपत्ता करीन,” असा इशारा दिला होता. या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष नवी मुंबईकडे लागले होते. अखेर निकालांनी नाईकांचा इशारा खरा ठरवला. नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नेरूळमधून रुपाली भगत या विजयी झाल्यानंतर नेरुळ परिसरात काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीला हिंसक वळण लागल्याची घटना घडली.

भाजप अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांचे बंधू काशिनाथ पाटील आणि शिवसेनेचे मातब्बर नेते रंगनाथ औटी यांचा पराभव करत मनसेचे उमेदवार अभिजित देसाई यांनी प्रभाग क्रमांक २२ ‘ड’ मधून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह नवी मुंबईत मनसेने आपले खाते उघडले आहे. उबाठा गटातून शिवसेनेत गेलेल्या गद्दारांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारले आहे. हा निकाल लोकशक्तीची उभारी देणारा आहे. या लढतीत जनशक्तीने बाजी मारली आहे. राज्याचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली असून वनमंत्री गणेश नाईक यांनी गेल्या ३० वर्षांत केलेल्या कामाला जनतेने पुन्हा एकदा संधी देत कौल दिला आहे. जनतेचा विश्वास आम्ही सार्थ ठरवू, नवी मुंबईतील सर्व करदात्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार.
गजानन काळे (मनसे प्रवक्ते)
आता कोणत्याही प्रकारचे आरोप-प्रत्यारोप होणार नाहीत. माझ्या कार्यकर्त्यांनीही संयम बाळगावा. लढाई संपली आहे आणि शत्रुत्वालाही आता अंत आहे. पुढील महिन्यात कोणती विकासकामे हाती घ्यायची, याची सविस्तर रूपरेषा तयार करण्यात येणार आहे. निवडून आलेल्या ६५ नगरसेवकांना योग्य ते प्रशिक्षण दिले जाईल. ‘शेर’ या लौकिकाला साजेसे, दर्जेदार आणि दीर्घकालीन विकासकाम करण्यात येईल. याशिवाय २०३० पर्यंत वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबवण्यात येणार आहे.
गणेश नाईक, वनमंत्री
आमचा कार्यकर्ता जिंदाबाद! हा विजय माझ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आणि त्यांनी प्रभागनिहाय घेतलेल्या अथक मेहनतीचा आहे. आम्ही शंभरी पार केली असती; मात्र मतदारांची नावे गहाळ होणे, ईव्हीएम मशीन संथ गतीने चालणे, तसेच मतदार यादीतील नावे लांबच्या व भलत्याच मतदान केंद्रांवर दर्शवली जाणे, अशा विविध घोळांमुळे अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या.
हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष : बविआ
एका नगरसेवकावरून आम्ही ४४ नगरसेवकांपर्यंत आलो, याचे समाधान आहे. केवळ विरोधासाठी विरोध करणार नाही; तर सत्ताधाऱ्यांना विकासाच्या मुद्द्यांवर सहकार्य करत महापालिकेत पहारेकऱ्याची चोख भूमिका बजावू. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यकतेनुसार राज्य व केंद्र शासनाची मदत पालिकेला मिळवून देऊ. आमचे सर्व नगरसेवक जनतेच्या हितासाठी सदैव तत्पर राहतील.
राजन नाईक, आमदार : नालासोपारा
ज्ञानेश्वरनगर आणि रामचंद्रनगर परिसरातील अस्वच्छता, खोदलेले रस्ते, कचऱ्याचे ढीग आणि धोकादायक वीजवाहिन्या हे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. मतदारांनी दिलेल्या विश्वासाचे सोने करून या प्रभागाचा कायापालट करू. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासासाठी कटिबद्ध राहीन.
शहाजी खुस्पे, नवनिर्वाचित नगरसेवक

BMC Election: मुंबई महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांची यादी; एका क्लिकवर वाचा सर्व माहिती

BMC Election : मुंबईच्या चाव्या महायुतीकडे; महापालिका निसटली, उद्धव ठाकरेंनी दिली कडवी झुंज

Maharashtra Local Body Election Results : राज्यात भाजपच ‘मोठा’ भाऊ; २९ पैकी २३ महापालिकांवर महायुतीचा कब्जा

BMC Election : मुंबईचे महापौरपद भाजपकडे तर शिंदेंचा उपमहापौर? २८ जानेवारीला महापौरपदाची निवडणूक

Thane : स्वबळाचा नारा काँग्रेसच्या अंगलट; ६० उमेदवारांना ‘भोपळा’ही फोडता आला नाही