नवी मुंबई

नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून शिवसैनिकांनी व्यक्त केला निषेध!

पेण नगरपरिषद येथील कोतवाल चौकामध्ये सर्व शिवसैनिक जमले होते. या वेळी राहुल नार्वेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी देत संपूर्ण परिसर दनानून सोडला होता

Swapnil S

पेण : सुमारे दीड वर्ष सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात निकाल देऊन शिंदे गट हेच खरी शिवसेना आहे. तसेच शिंदे गटाचे १६ आमदारांना अपात्र न करता सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिल्याने संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिकांनी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने केली. गुरुवारी पेणमधील शिवसैनिकांनी राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडो मारून आणि काळे झेंडे दाखवून आपला निषेध व्यक्त केला.

पेण नगरपरिषद येथील कोतवाल चौकामध्ये सर्व शिवसैनिक जमले होते. या वेळी राहुल नार्वेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी देत संपूर्ण परिसर दनानून सोडला होता. सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीचा कोणताही आधार न घेता राहुल नार्वेकर यांनी पक्षपातीपणा आणि भाजपची सुपारी घेऊन आमदार पात्रतेवर निकाल दिला आहे. भाजपला प्रादेशिक पक्ष संपवायचे असल्याने शिंदे गट आणि राहुल नार्वेकर यांच्या खांद्यावर बंदूक घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर हा निशाणा भाजपने साधला आहे. परंतु ठाकरेंची शिवसेना ही महाराष्ट्रातील सामान्य मतदारांपर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे जरी आमदार खासदार हे फुटले असतील तरी कट्टर शिवसैनिक मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. भाजपची हुकूमशाही या निवडणुकीत जनता मोडून काढणार आहे, असा विश्वास शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे यांनी व्यक्त केला.

या निषेध आंदोलनाला शिवसेना महिला आघाडीच्या दिपश्री पोटफोडे, तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर, प्रदीप वर्तक, चेतन मोकल, शहर प्रमुख मयुरेश चाचड, यांसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Navi Mumbai : खारघरमधील भूखंडाला सर्वाधिक बोली; सेंट्रल पार्कलगतचा प्लॉट तब्बल २१०० कोटींना

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय

निवडणुकीच्या तोंडावर सरकारला गरीबांची आठवण; 'शिवभोजन थाळी'ची पुन्हा घेता येणार चव; २८ कोटींचा निधी उपलब्ध

मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी कोलंबिया पॅटर्न; आज महाराष्ट्रात येणार कोलंबियाचे पथक

Mumbai : सर्व मेट्रो संस्थांच्या एकत्रीकरणासाठी समिती; ३ महिन्यांत अहवाल शासनास करणार सादर