PM
नवी मुंबई

नवी मुंबईत अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका बी विभाग नेरूळ कार्यक्षेत्रातील सानपाडा, सेक्टर २१, भूखंड क्र.१ + २ ए, नोड होल्डिंग पाँन्डवर अतिक्रमण केल्याबाबत तेथील अनधिकृत बांधकामधारकांना नोटीस बजाविण्यात आली होती. त्या नोटीसीची मुदत संपुष्टात येऊन सदर अनधिकृत बांधकाम संबंधितांकडून स्वत:हून हटविण्यात आले नाही.

त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, नेरूळ विभाग कार्यालयाच्यावतीने धडक कारवाई करीत २३ जुलै रोजी सानपाडा, सेक्टर २१, नोड होल्डिंग पाँड याठिकाणी उभारण्यात आलेल्या ७ अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या कावाईच्या माध्यमातून सदर भूखंड मोकळे करण्यात आले आहेत.

सदर कारवाई महापालिका अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांचे मार्गदर्शनाखाली व नेरूळ विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे यांच्या नियंत्रणाखाली, अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचारी, सुरक्षारक्षक, स्थानिक पोलीस यांच्या सहयोगाने करण्यात आली. या मोहीमेकरिता २० मजूर, १ मुकादम, १ गॅस कटर, २ जेसीबी, व १ डम्पर अशाप्रकारे मनुष्यबळ व साधने वापरण्यात आली.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?