नवी मुंबई

स्थानिक भूमिपुत्रांच्या ''गण गण गणपती'' गाण्याची नवी मुंबईत धूम

देवांग भागवत

आनंदमय वातावरणात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत आहे. यात दुग्धशर्करा योग्य म्हणजे नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांनी एकत्र येत लाडक्या गणरायासाठी 'गण गण गणपती' शिर्षकांतर्गत गाणे तयार केले आहे. ३१ ऑगस्ट रोजी हे गाणे प्रदर्शित झाले असून नवी मुंबईत सध्या याच गाण्याची धूम असून लहानांपासून ज्येष्ठ सर्वच या गाण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

गणेशोत्सवासाठी भूमिपुत्र सहाय्यक दिग्दर्शक प्रसन्नजीत मोहिते, आनंद शाही, एंटरटेनमेंट प्रस्तुत 'गण गण गणपती' या एडिटर अलोक कोळी यांच्या महेनतीने 'गण गण गणपती' शिर्षकांतर्गत गाणे गणेशभक्तांच्या भेटीला आले आहे. भूमिपुत्र एंटरटेनमेंटद्वारे सादर करण्यात आलेले हे गाणे गणेश भक्तांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. नेरुळ सेक्टर- १४ कुकशेत येथील वेलकम बँक्वेट हॉलमध्ये ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 'गण गण गणपती' हे गाणे प्रथम प्रदर्शित करण्यात आले. माजी नगरसेवक गिरीष म्हात्रे, 'भूमिपुत्र एंटरटेनमेंट' चे देवनाथ म्हात्रे, आशिष कडू, केतन पाटील, पवन म्हात्रे, साई म्हात्रे, मयूर पाटील, श्रध्दा घरत यांच्यासह 'भूमिपुत्र एंटरटेनमेंट' च्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीत गाण्याचे लॉन्चिंग करण्यात आले. गाण्याचे दिग्दर्शक अभिषेक कोळी असून गाण्यासाठी बालकलाकार साईशा भोईर हिने सुंदर भूमिका साकार केली आहे. त्यासोबतच अभिनेता विक्रम आल्हत, अभिनेत्री अस्मिता सुर्वे यांनी देखील अचूक भूमिका पार पाडली आहे. तर या गाण्यासाठी निर्माता जितेन रामचंद्र घरत, गायक-संगीतकार केवल वाळुंज, गणेश वटकर, सहदिग्दर्शक आतिश आखाडे यांनी देखील विशेष मेहनत घेतली आहे. दरम्यान, भूमिपुत्र एंटरटेनमेंटद्वारे नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांना एकत्रित करुन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा तसेच त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवून हे गाणे भक्तांच्या भेटीस आणल्याचे भूमिपुत्र एंटरटेनमेंट टीमद्वारे सांगण्यात आले आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल