नवी मुंबई

सिडकोमार्फत ९०२ कुटुंबांचे घराचे स्वप्न होणार साकार, सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ

‘सिडको'तर्फे कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या शुभमुहूर्तावर २७ ऑगस्ट रोजी नवी मुंबई मधील गृहसंकुलांतील एकूण ९०२ सदनिकांच्या ‘गृहनिर्माण योजना’चा प्रारंभ करण्यात आला.

Swapnil S

नवी मुंबई : ‘सिडको'तर्फे कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या शुभमुहूर्तावर २७ ऑगस्ट रोजी नवी मुंबई मधील गृहसंकुलांतील एकूण ९०२ सदनिकांच्या ‘गृहनिर्माण योजना’चा प्रारंभ करण्यात आला. एकूण ९०२ सदनिकांपैकी नवी मुंबईतील कळंबोली, खारघर आणि घणसोली या विकसित नोडमधील २१३ आणि ‘सिडको’च्या खारघर येथील व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार - सेलिब्रेशन गृहसंकुलांतील ६८९ सदनिका विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

‘सिडको’तर्फे सातत्याने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्यात येतात. या वर्षीच्या गोपाळकाल्याच्या मुहूर्तावर उपलब्ध ९०२ सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या योजना अंतर्गत कळंबोली, खारघर आणि घणसोली नोडमधील उपलब्ध २१३ सदनिकांपैकी ३८ सदनिका या प्रधानमंत्री आवास योजना अंर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि १७५ सदनिका या सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. तसेच ‘सिडको’च्या खारघर येथील व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलातील उपलब्ध ६८९ सदनिकांपैकी ४२ सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता, ३५९ सदनिका अल्प उत्पन्न गटाकरिता, १२८ सदनिका मध्यम उत्पन्न गटाकरिता आणि १६० सदनिका या उच्चउत्पन्न गटाकरिता उपलब्ध आहेत.

सदर ‘योजना’च्या ऑनलाईन अर्ज नोंदणीस २७ ऑगस्ट पासून प्रारंभ झाला असून योजनेकरिता संगणकीय सोडत १० ऑक्टोबर २०२४ रोजी काढण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी तसेच योजनेच्या सविस्तर माहितीकरिता सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या गृहनिर्माण योजनाद्वारे नागरिकांना सर्व पायाभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या नवी मुंबईमध्ये आपले हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे. या गृहसंकुलांना रेल्वे, रस्ते, मेट्रोद्वारे कनेक्टिव्हिटी लाभली आहे. ‘सिडको’च्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह ‘सिडको’चे अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्प या गृहसंकुलांपासून नजिकच्या अंतरावर आहेत. यामुळे नागरिकांना एक परिपूर्ण जीवनशैली अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

दुकानांसाठी ऑनलाईन अर्ज

‘सिडको’तर्फे बामणडोंगरी येथील गृहसंकुलांतील १०० उपलब्ध दुकानांच्या विक्रीची योजना जाहीर करण्यात आली असून ३० ऑगस्ट२०२४ पासून योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीस प्रारंभ होणार आहे. या योजना अंतर्गत वेगाने विकसित होत असलेल्या उलवे नोडमध्ये आपला व्यवसाय वाढवण्याची संधी लहान आणि मध्यम व्यावसायिकांना लाभणार आहे. ‘सिडको’तर्फे सातत्याने राबविण्यात येत असलेल्या या योजनांद्वारे सर्वसामान्य नागरिक, विकासक, व्यावसायिक अशा विविध घटकांना लाभ होऊन शहराचा सर्वांगीण विकास होण्यासही हातभार लागतो. सदर योजना अंतर्गत ‘सिडको’तर्फे बामणडोंगरी गृहसंकुल, भूखंड क्र.२, सेक्टर-६, उलवे येथील २४३ पैकी १०० दुकाने विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सदर योजनेच्या ऑनलाईन नोंदणीस ३० ऑगस्ट पासून प्रारंभ होणार असून ई-लिलाव तथा ई-निविदा प्रक्रियाद्वारे दुकानांची विक्री करण्यात येणार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी