नवी मुंबई

महानगरपालिकेत १२० अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी १२० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या काळात स्थगित केलेल्या बदल्यांचाही समावेश आहे.

यामध्ये दंत शल्य चिकित्सक डॉ. अजय गडदे यांच्याकडे सध्या असलेला सार्वजनिक रुग्णालय वाशी कोविड संपूर्ण कामकाज नियंत्रित करण्याचे काम आहे. त्याच्या व्यतिरिक्त अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त (मुख्यालय) म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच राज्य शासनाने महसूल आणि वन विभागाच्या कक्ष अधिकारी ऋतुजा गवळी यांना नवी मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून प्रतिनियुक्तीने पाठवले आहे. त्यांना आयुक्तांनी उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

सध्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेले जयंत जावडेकर यांची घनकचरा व्यवस्थापन विभागात बदली करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन भागातील मुख्य स्वच्छता अधिकारी हे पद गेल्या काही दिवसांपासून रिक्त होते.

या ठिकाणी अनेक स्वच्छ्ता अधिकारी या पदाच्या पदाचा कार्यभार मिळण्याकरिता स्पर्धेत होते; त्या वेळी पैकी सतिश सनदी यांची या ठिकाणी वर्णी लागली आहे. अन्य बदल्या पुढील प्रमाणे आहेत. करार वरील शिपाई -२३, उपअभियंता - ५, कनिष्ठ अभियंता - ७, डॉक्टर - ६, स्वच्छ्ता अधिकारी ४ , लिपिक १, वैद्यकीय समाज सेवक २, परिचारिका १, शाखा अभियंता १, सहाय्यक आयुक्त १, नवीन १, सफाई कामगार -१८, स्वच्छ्ता निरीक्षक १४, शिपाई -३५ अशा एकूण १२० अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस