नवी मुंबई : बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि ऐरोलीचे आमदार वनमंत्री गणेश नाईक हे दोघे एकाच पक्षाचे नेते असतानाही त्यांच्यात नेहमीच जुंपलेली असते. वन मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांना पुन्हा स्वगृही परतण्याचे वेध लागल्याची सर्वत्र उघड चर्चा आहे. यामुळे आमदार मंदा म्हात्रे यांची नाराजी लपलेली नाही, या पार्श्वभूमीवर एका क्रिकेटच्या सामन्यांच्या उदघाटन सोहळ्यात मंदा म्हात्रे यांनी 'कल कां भूला वापस दुबारा घरं मे आता है तो उसे भुला नहीं कहते' असा टोला नाईक कुटुंबियांचे नाव न घेता लगावला आहे.
संदीप नाईक यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीत गेलेल्या २७ माजी नगरसेवकांनी नुकत्याच एका भाजपच्या राजकीय पक्षांतर्गत बैठकीत भाजपमध्ये प्रवेश केला. क्रिकेट आणि हुतुतू हे आपले खेळ असून राजकारणातही खेळले जातात. हे राजकारणाशी निगडीत असल्याने कधी-कधी खेळाप्रमाणे राजकारणातही डावपेच आखावे लागतात, त्यामुळे त्यांना क्रिकेटसोबतच इतर खेळांचे विशेष आकर्षण ठरत असल्याचे आ. म्हात्रे यांनी म्हटले आहे.