नवी मुंबई

गांजा, देशी दारूची विक्री करणारा तरुण अटकेत

वृत्तसंस्था

शिळफाटा महापे मार्गालगतच गांजा व देशी दारूची विक्री करणाऱ्या तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शुक्रवारी सायंकाळी सापळा रचून अटक केली आहे. विकी विजय बनसोडे (२१) असे या तरुणाचे नाव असून, अमली पदार्थविरोधी पथकाने त्याच्याजवळ असलेला १ किलो १६० ग्रॅम वजनाचा गांजा व टँगो पंच या देशी दारूच्या ९० मिलीच्या २५ बाटल्यांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शिळफाटा ते महापे मार्गालगतच्या हनुमान नगर झोपडपट्टीत रस्त्याच्या बाजूला एक तरुण गांजा या अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी कक्षाला मिळाली होती.

त्यानुसार अमली पदार्थविरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद व त्यांच्या पथकाने शिळफाटा ते महापेकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा लावला होता. त्यावेळी अमली पदार्थविरोधी पथकाने विकी बनसोडे याला ताब्यात घेतले. अमली पदार्थविरोधी पथकाने त्याच्याकडून २३ हजार रुपये किमतीचा गांजा व देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.

शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, संजय निरुपम यांचा दावा

गँगरेपनंतर तलवारीनं कापली बोटे...बांसवाडा घटनेची हादरवून टाकणारी कहाणी, आरोपींनी गाठला क्रूरतेचा कळस

"नाहीतर देशातील हुकुमशाही सुरुच राहील..."खासदार अरविंद सावंतांची पंतप्रधान मोदींवर टीका

लष्करातील जवानाने EVM मध्ये फेरफार करण्यासाठी अंबादास दानवेंकडे मागितले २.५ कोटी!

Auto Sweep Service: बँकेत जाऊन फक्त 'हे' सांगा, बचत खात्यावर मिळेल तिप्पट व्याज