संपादकीय

कोरोनामुळे डॉक्टरांतील देव दिसला ; सुरेश काकाणी यांच्या ‘लढा मुंबईचा कोविड’शी पुस्तकाचे प्रकाशन

नवशक्ती Web Desk

जगभरात भयावह वातावरण निर्माण करणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणू काय याचा अनुभव कोणाकडे नव्हता. माणूस माणसापासून दुरावला गेला. पण कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरसावले ते डॉक्टर, परिचारीका व आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार. यावेळी जीव धोक्यात आहे हे माहीत असतानाही डॉक्टर परिचारिका आरोग्य अधिकारी व कर्मचारी देवासारखे पुढे आले. डॉक्टरांमुळे हजारो कोरोना बाधित रुग्णांना जीवनदान दिले. कोरोनामुळे डॉक्टरांतील देव दिसला, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले. मुंबई महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी लिखित ‘लढा मुंबईचा कोविडशी’ या पुस्तक प्रकाशनाचे गुरुवारी करण्यात आले.

मुंबई मराठी पत्रकार संघातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सुरेश काकाणी याच्या पुस्तकाचे प्रकाशन नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या पुस्तकात मुंबईने दिलेल्या कोविड लढ्यातील ‘खर्‍या योद्ध्यां’चे अनुभवही काकाणी यांनी पुस्तकात नमूद केले आहेत. कोरोना काळात घरातून बाहेर निघणे मुश्कील झाले असताना प्रत्यक्ष फिल्डवर अनेकांनी स्वत:च्या जिवाची बाजी लावत अनेकांचे जीव वाचवले. यामध्ये सफाई कामगारांपासून परिचारिका, डॉक्टर, आयोग्य सेविका, आशा सेविका यांच्यासह अनेकांचा समावेश होता. या तळागाळातील कोविड योद्ध्यांचा अनुभव या पुस्तकात काकाणी यांनी नमूद केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कोविड योद्ध्यांचा सन्मान करीत त्यांना आपले अनुभव सांगण्याची संधीही देण्यात आली.

या पुस्तकाचे शब्दांकन पत्रकार सुमित्रा देबरॉय यांनी केले असून, मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद वैशाली रोडे यांनी केला आहे. तर ‘ग्रंथाली’ प्रकाशानने पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या सोहळ्याप्रसंगी पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, डॉ. मोहन जोशी, डॉ. निलीमा अंद्राडे, उपायुक्त संजय कुर्‍हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?