'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
संपादकीय

माणुसकीच्या निष्पापांसंगे युद्ध आमुचे सुरू...

जगभर काही माथेफिरू राष्ट्रप्रमुखांच्या सत्तेच्या हव्यासापोटी युद्धज्वर बळावत आहे आणि जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. मोठ्या प्रमाणात वाढणारी बेरोजगारी, महागाई, सत्तेविरोधातील वाढता असंतोष यावरून लक्ष हटवण्याकरिता युद्धाचा वापर केला जातो.

नवशक्ती Web Desk

विशेष

गीतेश गजानन शिंदे

जगभर काही माथेफिरू राष्ट्रप्रमुखांच्या सत्तेच्या हव्यासापोटी युद्धज्वर बळावत आहे आणि जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. मोठ्या प्रमाणात वाढणारी बेरोजगारी, महागाई, सत्तेविरोधातील वाढता असंतोष यावरून लक्ष हटवण्याकरिता युद्धाचा वापर केला जातो.

साधारण आठ-नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी कोचिंग क्लासेसमध्ये अकरावीच्या वर्गात भौतिकशास्त्राचं लेक्चर घेत होतो. पण जेव्हा जेव्हा माझी पाठ वर्गाकडे जायची आणि मी फळ्यावर लिहू लागायचो, तेव्हा मागल्या बाकावरील विद्यार्थ्यांपैकी कोणीतरी आवाज काढून पूर्ण वर्ग डिस्टर्ब करायचा. असं दोन-तीन वेळा घडलं. मी एकदा ओरडून सूचनाही दिली. बहुदा त्या मुलाचा शिक्षणाशी तसा काही संबंध नव्हता आणि त्याच्या या कृतीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही चेव चढत होता. तेही टिवल्याबावल्या करू लागले. पुन्हा फळ्यावर लिहीत असताना मागे खुसखुस सुरू झाली. त्याने मी अस्वस्थ झालो आणि मनात कवितेची ओळ सुचली, ‘ज्यांना उद्याच्या सूर्याची नाहीये शाश्वती...’ तत्क्षणी मी खडू ठेवला आणि विद्यार्थ्यांना रागानं म्हटलं की, “मी आता पुढे शिकवणार नाही. तुम्ही पुस्तकातून हा धडा वाचायचा. वीस मिनिटांनी मी तुम्हाला प्रश्न विचारीन आणि ज्यांना उत्तर देता येणार नाही त्यांनी उद्या आई-वडिलांना घेऊन यायचं.”

या घोषणेसह वर्ग कर्फ्यू लागल्यासारखा चिडीचूप झाला. मी शांतपणे कोपऱ्यातील रिकाम्या बाकावर विद्यार्थ्यांकडे तोंड करून बसलो. कागद, पेन काढलं आणि झरझर लिहू लागलो,

‘ज्यांना उद्याच्या सूर्याची नाहीये शाश्वती

ज्यांच्या खिडक्यांच्या काचा केव्हाच फुटल्यात

कानठळ्या बसवणाऱ्या बॉम्ब हल्ल्यांनी,

ज्यांच्या आभाळाच्या तुकड्यात

किलबिलाटाच्या जागी

उमटताहेत फायटर प्लेनच्या किंकाळ्या

घुमत राहतो रात्रभर ड्रोन्सच्या घुबडांचा घुत्कार

शेतात ट्रॅक्टरऐवजी फिरताहेत रणगाडे...’

दहा-बारा मिनिटांतच ‘स्वप्नं’ ही कविता भरवर्गात लिहून मी मोकळा झालो. मुलांना म्हटलं, “आता ऐका ही कविता!” आणि त्यांच्यासमोर नुकतीच जन्मलेली कविता वाचून दाखवली. काही मुलांच्या डोळ्यांत मला कविता ऐकल्यावर करुणा आणि तुटल्याची भावना दिसलीही. पण माझ्यासमोर होती शिक्षणासाठी गलेलठ्ठ फी मोजलेली, एसी वर्गात बसलेली तरुण मुलं-मुली. ज्यांच्या हातात लेटेस्ट सॅमसंग गॅलेक्सी, आयफोन्स होते. ज्यांची कंपास पेटी नवी कोरी होती, दप्तरात उत्तम दर्जाच्या, कागदाच्या, बांधणीच्या वह्या होत्या. प्रत्येकाकडे त्यांचं स्वतंत्र पुस्तक होतं. पण शिकण्याची इच्छाशक्ती आणि मन:स्थिती? ती मात्र अभावानंच दिसत होती. पण या उलट जिथे युद्ध सुरू असतं किंवा युद्धजन्य परिस्थिती असते अशा मुलांना शिक्षण घेण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागतो. मला त्यावेळी आठवली ती पाकिस्तानातली मलाला यूसुफजई. जिने तालिबानने मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली असताना, भीती न बाळगता शिक्षणाच्या अधिकारासाठी लढा दिला. म्हणूनच ऑक्टोबर २०१२ मध्ये, शाळा सुटल्यावर तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला, ज्यात ती थोडक्यात बचावली. पण तरीदेखील तिने आपला लढा सोडला नाही. त्याकरिता २०१४ मध्ये, कैलाश सत्यार्थी यांच्यासोबत संयुक्तपणे मलालाला वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी नोबेल शांतता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मलाला यूसुफजई हिचं शिक्षणाचं महत्त्व सांगणारं एक प्रसिद्ध वाक्य आहे, “एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन जग बदलू शकतात.” पण इथे मुंबईसारख्या महानगरात सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतानाही मुलांना शिकण्याची उर्मीच नव्हती.

पण किती विदारक परिस्थिती असेल अशा युद्धग्रस्त मुलांसमोर. जिथे जिवंत राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो. उद्याचा सूर्योदय पाहता येईल की नाही याची कोणतीही शाश्वती देता येत नाही. कारण त्यांच्या आकाशात पक्षांऐवजी फायटर जेट्सच्या किंकाळ्या घुमतात. रात्रभर जणू ड्रोन्सची घुबडं त्यांच्या इमारतींच्या बाहेर घुत्कार करतात. ज्यांच्या श्वासात बारूद मिश्रित हवा मिसळली जातेय. ज्यांची पाटी केव्हाच फुटलीये. त्यांच्या वर्गात आता खडूंऐवजी काडतुसं सापडताहेत. होय!

गेल्या आठवड्यातच अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केला आणि मध्यपूर्व आशियावरती युद्धाचे ढग दाटून आले. पहिल्याच दिवशी इराणमधील प्रमुख धर्मांध नेता आयतुल्लाह खामेनी आणि इतर ४८ जणांना यमसदनी पाठवल्याची माहिती खुद्द अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांना दिली. परंतु याने युद्धविराम मिळाला का? उलट इराण आणखी त्वेषानं अमेरिका व इस्रायलचा प्रतिकार करू लागला. जॉर्डन, कुवेत, ओमान, कतार दुबई, सौदी अरेबिया हे देशही युद्ध कचाट्यात सापडले आहेत. कारण अमेरिकेचे संरक्षण तळ, त्यांची साधनसामग्री या देशांमध्ये आपत्कालीन स्थिती हाताळण्याकरिता तैनात केलेली होती. परंतु सुक्याबरोबर ओलंही जळतं असं म्हणतात, त्याप्रमाणेच या युद्धाची झळ फक्त मध्यपूर्व आशियातील देशांनाच नव्हे, तर ती जगभर बसणार आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत.

एकूणच जगभर काही माथेफिरू राष्ट्रप्रमुखांच्या सत्तेच्या हव्यासापोटी युद्धज्वर वाढत आहे आणि जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. पण इतिहासात डोकावल्यावर लक्षात येतं की, मोठ्या प्रमाणात वाढणारी बेरोजगारी, महागाई, सत्तेविरोधातील वाढता असंतोष यावरून लक्ष हटवण्याकरिता युद्धाचा आणि धर्माचा अस्त्र म्हणून वापर केला जातो. सध्या ट्रम्प आणि इस्रायलचे राष्ट्रप्रमुख बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात त्यांच्याच देशात असंतोषाचं वातावरण आहे. अनेक भ्रष्टाचाराचे आरोप या नेतन्याहू महोदयांवर झालेले आहेत. ट्रम्प यांचे हात एपस्टीन फाइलने बरबटलेले आहेत.

अर्थात आयतुल्लाह खामेनीही धुतल्या तांदळासारखा नव्हता. १९८० च्या दशकातील छायाचित्र आणि व्हिडीओज् पाहिले तर लक्षात येतं की, त्यावेळी इराणमधील महिला, तरुणी पाश्चिमात्य कपडेही घालू शकत होत्या. मुलींना शिक्षणाचा, निर्णय घेण्याचा अधिकार होता. परंतु खामेनीच्या उदयासह इराणमधील स्त्रियांच्या समानतेचा सूर्य अस्तंगत झाला. त्याने अनेक फतवे काढले आणि स्त्रियांना बुरख्याच्या काळकोठडीत बंदिस्त केलं. इतकंच काय, तर मुलींच्या लग्नाचं वय नऊ इतकं कमी केलं. म्हणजे मासिक पाळी येण्यापूर्वीच तिला उजवून टाका, असा जणू फतवाच काढण्यात आला. स्त्रीचं मन महत्त्वाचं नसून या दमनी व्यवस्थेला उपभोगण्यासाठी फक्त तिचा देह हवा आहे हे यातून अधोरेखित होतं. तरीदेखील या खामेनीच्या मृत्यूनंतर त्याला शहादत बहाल करण्याची जणू मुस्लिम व इतर राष्ट्रांमध्ये स्पर्धाच लागली. भारतही यास अपवाद नाही. काश्मीरपासून लखनऊ अगदी कर्नाटक व मुंबईतील काही भागांमध्येही शोकसभा आयोजित करण्यात आल्या, रस्त्यांवर निदर्शनं करण्यात आली. यात भारतातील बुरखा घातलेल्या महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. पण इराणमध्ये मात्र काही महिलांनी बुरखा जाळून मोकळा श्वास घेतल्याचे व्हिडीओ पाहण्यात आले. जगण्यात, वागण्यात किती विरोधाभास आहे ना! लोकशाही असणाऱ्या देशातील स्त्रियांनाही आपल्या स्वातंत्र्याची, अस्तित्वाची जाणीव होऊ नये इतका त्यांच्या मनावरील धर्म व्यवस्थेचा पगडा मोठा आहे.

इराणच्या एका शाळेवर मिसाईल पडलं आणि १६० मुलं त्यात मारली गेल्याची बातमी ऐकून मी सुन्न झालो. त्यामुळे ‘माणुसकीच्या निष्पापांसंगे युद्ध आमुचे सुरू’ असंच आता खेदानं म्हणावं लागतंय. कालांतरानं युद्ध संपेल, सर्वोच्च नेते शांतता करार झाल्यावर हात मिळवतील; पण सामान्यांच्या हातातून वेळ आणि बरंच काही निसटून गेलं असेल.

खरं तर हे जग काही मूठभर व्यापारी चालवतात. त्यांना पक्कं ठाऊक आहे की काय विकायचंय. कशातून नफा कमवायचा आहे. उद्यापासून जर जगभरातील सर्व युद्ध थांबली तर बंदुकांना, रायफलींना, रणगाड्यांना काही वर्षांनी गंज चढेल. त्यांच्या आतली स्प्रिंग जाम होईल. काडतुसामधल्या दारूची राख मातीत मिसळेल. हॅन्ड ग्रेनेडला पाखरं अननस समजतील. कदाचित बंकरमध्येच मुंग्याचं वारूळ तयार होईल. ड्रोन्सऐवजी फक्त रंगीबेरंगी पतंगच आकाशात मुक्तपणे उडतील. कवी दासू वैद्य यांनी एका कवितेत लिहिलंच आहे की,

‘बंदुकीच्या निळकांडीत

चिमणीनं करावा खोपा,

बॉम्बचे व्हावेत रंगीबेरंगी फुगे

झेंड्यांनी दाखवावी दिशा फक्त वाऱ्याची’

खरंच असं घडलं तर जग किती सुंदर होईल. हीच विश्वशांतीची प्रार्थना ठरो! पण त्याकरिता युद्धाची नव्हे, तर जगाला बुद्धाची आत्यन्तिक गरज आहे!

धारण आठ-नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी कोचिंग क्लासेसमध्ये अकरावीच्या वर्गात भौतिकशास्त्राचं लेक्चर घेत होतो. पण जेव्हा जेव्हा माझी पाठ वर्गाकडे जायची आणि मी फळ्यावर लिहू लागायचो, तेव्हा मागल्या बाकावरील विद्यार्थ्यांपैकी कोणीतरी आवाज काढून पूर्ण वर्ग डिस्टर्ब करायचा. असं दोन-तीन वेळा घडलं. मी एकदा ओरडून सूचनाही दिली. बहुदा त्या मुलाचा शिक्षणाशी तसा काही संबंध नव्हता आणि त्याच्या या कृतीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही चेव चढत होता. तेही टिवल्याबावल्या करू लागले. पुन्हा फळ्यावर लिहीत असताना मागे खुसखुस सुरू झाली. त्याने मी अस्वस्थ झालो आणि मनात कवितेची ओळ सुचली, ‘ज्यांना उद्याच्या सूर्याची नाहीये शाश्वती...’ तत्क्षणी मी खडू ठेवला आणि विद्यार्थ्यांना रागानं म्हटलं की, “मी आता पुढे शिकवणार नाही. तुम्ही पुस्तकातून हा धडा वाचायचा. वीस मिनिटांनी मी तुम्हाला प्रश्न विचारीन आणि ज्यांना उत्तर देता येणार नाही त्यांनी उद्या आई-वडिलांना घेऊन यायचं.”

या घोषणेसह वर्ग कर्फ्यू लागल्यासारखा चिडीचूप झाला. मी शांतपणे कोपऱ्यातील रिकाम्या बाकावर विद्यार्थ्यांकडे तोंड करून बसलो. कागद, पेन काढलं आणि झरझर लिहू लागलो,

‘ज्यांना उद्याच्या सूर्याची नाहीये शाश्वती

ज्यांच्या खिडक्यांच्या काचा केव्हाच फुटल्यात

कानठळ्या बसवणाऱ्या बॉम्ब हल्ल्यांनी,

ज्यांच्या आभाळाच्या तुकड्यात

किलबिलाटाच्या जागी

उमटताहेत फायटर प्लेनच्या किंकाळ्या

घुमत राहतो रात्रभर ड्रोन्सच्या घुबडांचा घुत्कार

शेतात ट्रॅक्टरऐवजी फिरताहेत रणगाडे...’

दहा-बारा मिनिटांतच ‘स्वप्नं’ ही कविता भरवर्गात लिहून मी मोकळा झालो. मुलांना म्हटलं, “आता ऐका ही कविता!” आणि त्यांच्यासमोर नुकतीच जन्मलेली कविता वाचून दाखवली. काही मुलांच्या डोळ्यांत मला कविता ऐकल्यावर करुणा आणि तुटल्याची भावना दिसलीही. पण माझ्यासमोर होती शिक्षणासाठी गलेलठ्ठ फी मोजलेली, एसी वर्गात बसलेली तरुण मुलं-मुली. ज्यांच्या हातात लेटेस्ट सॅमसंग गॅलेक्सी, आयफोन्स होते. ज्यांची कंपास पेटी नवी कोरी होती, दप्तरात उत्तम दर्जाच्या, कागदाच्या, बांधणीच्या वह्या होत्या. प्रत्येकाकडे त्यांचं स्वतंत्र पुस्तक होतं. पण शिकण्याची इच्छाशक्ती आणि मन:स्थिती? ती मात्र अभावानंच दिसत होती. पण या उलट जिथे युद्ध सुरू असतं किंवा युद्धजन्य परिस्थिती असते अशा मुलांना शिक्षण घेण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागतो. मला त्यावेळी आठवली ती पाकिस्तानातली मलाला यूसुफजई. जिने तालिबानने मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली असताना, भीती न बाळगता शिक्षणाच्या अधिकारासाठी लढा दिला. म्हणूनच ऑक्टोबर २०१२ मध्ये, शाळा सुटल्यावर तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला, ज्यात ती थोडक्यात बचावली. पण तरीदेखील तिने आपला लढा सोडला नाही. त्याकरिता २०१४ मध्ये, कैलाश सत्यार्थी यांच्यासोबत संयुक्तपणे मलालाला वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी नोबेल शांतता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मलाला यूसुफजई हिचं शिक्षणाचं महत्त्व सांगणारं एक प्रसिद्ध वाक्य आहे, “एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन जग बदलू शकतात.” पण इथे मुंबईसारख्या महानगरात सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतानाही मुलांना शिकण्याची उर्मीच नव्हती.

पण किती विदारक परिस्थिती असेल अशा युद्धग्रस्त मुलांसमोर. जिथे जिवंत राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो. उद्याचा सूर्योदय पाहता येईल की नाही याची कोणतीही शाश्वती देता येत नाही. कारण त्यांच्या आकाशात पक्षांऐवजी फायटर जेट्सच्या किंकाळ्या घुमतात. रात्रभर जणू ड्रोन्सची घुबडं त्यांच्या इमारतींच्या बाहेर घुत्कार करतात. ज्यांच्या श्वासात बारूद मिश्रित हवा मिसळली जातेय. ज्यांची पाटी केव्हाच फुटलीये. त्यांच्या वर्गात आता खडूंऐवजी काडतुसं सापडताहेत. होय!

गेल्या आठवड्यातच अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केला आणि मध्यपूर्व आशियावरती युद्धाचे ढग दाटून आले. पहिल्याच दिवशी इराणमधील प्रमुख धर्मांध नेता आयतुल्लाह खामेनी आणि इतर ४८ जणांना यमसदनी पाठवल्याची माहिती खुद्द अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांना दिली. परंतु याने युद्धविराम मिळाला का? उलट इराण आणखी त्वेषानं अमेरिका व इस्रायलचा प्रतिकार करू लागला. जॉर्डन, कुवेत, ओमान, कतार दुबई, सौदी अरेबिया हे देशही युद्ध कचाट्यात सापडले आहेत. कारण अमेरिकेचे संरक्षण तळ, त्यांची साधनसामग्री या देशांमध्ये आपत्कालीन स्थिती हाताळण्याकरिता तैनात केलेली होती. परंतु सुक्याबरोबर ओलंही जळतं असं म्हणतात, त्याप्रमाणेच या युद्धाची झळ फक्त मध्यपूर्व आशियातील देशांनाच नव्हे, तर ती जगभर बसणार आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत.

एकूणच जगभर काही माथेफिरू राष्ट्रप्रमुखांच्या सत्तेच्या हव्यासापोटी युद्धज्वर वाढत आहे आणि जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. पण इतिहासात डोकावल्यावर लक्षात येतं की, मोठ्या प्रमाणात वाढणारी बेरोजगारी, महागाई, सत्तेविरोधातील वाढता असंतोष यावरून लक्ष हटवण्याकरिता युद्धाचा आणि धर्माचा अस्त्र म्हणून वापर केला जातो. सध्या ट्रम्प आणि इस्रायलचे राष्ट्रप्रमुख बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात त्यांच्याच देशात असंतोषाचं वातावरण आहे. अनेक भ्रष्टाचाराचे आरोप या नेतन्याहू महोदयांवर झालेले आहेत. ट्रम्प यांचे हात एपस्टीन फाइलने बरबटलेले आहेत.

अर्थात आयतुल्लाह खामेनीही धुतल्या तांदळासारखा नव्हता. १९८० च्या दशकातील छायाचित्र आणि व्हिडीओज् पाहिले तर लक्षात येतं की, त्यावेळी इराणमधील महिला, तरुणी पाश्चिमात्य कपडेही घालू शकत होत्या. मुलींना शिक्षणाचा, निर्णय घेण्याचा अधिकार होता. परंतु खामेनीच्या उदयासह इराणमधील स्त्रियांच्या समानतेचा सूर्य अस्तंगत झाला. त्याने अनेक फतवे काढले आणि स्त्रियांना बुरख्याच्या काळकोठडीत बंदिस्त केलं. इतकंच काय, तर मुलींच्या लग्नाचं वय नऊ इतकं कमी केलं. म्हणजे मासिक पाळी येण्यापूर्वीच तिला उजवून टाका, असा जणू फतवाच काढण्यात आला. स्त्रीचं मन महत्त्वाचं नसून या दमनी व्यवस्थेला उपभोगण्यासाठी फक्त तिचा देह हवा आहे हे यातून अधोरेखित होतं. तरीदेखील या खामेनीच्या मृत्यूनंतर त्याला शहादत बहाल करण्याची जणू मुस्लिम व इतर राष्ट्रांमध्ये स्पर्धाच लागली. भारतही यास अपवाद नाही. काश्मीरपासून लखनऊ अगदी कर्नाटक व मुंबईतील काही भागांमध्येही शोकसभा आयोजित करण्यात आल्या, रस्त्यांवर निदर्शनं करण्यात आली. यात भारतातील बुरखा घातलेल्या महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. पण इराणमध्ये मात्र काही महिलांनी बुरखा जाळून मोकळा श्वास घेतल्याचे व्हिडीओ पाहण्यात आले. जगण्यात, वागण्यात किती विरोधाभास आहे ना! लोकशाही असणाऱ्या देशातील स्त्रियांनाही आपल्या स्वातंत्र्याची, अस्तित्वाची जाणीव होऊ नये इतका त्यांच्या मनावरील धर्म व्यवस्थेचा पगडा मोठा आहे.

इराणच्या एका शाळेवर मिसाईल पडलं आणि १६० मुलं त्यात मारली गेल्याची बातमी ऐकून मी सुन्न झालो. त्यामुळे ‘माणुसकीच्या निष्पापांसंगे युद्ध आमुचे सुरू’ असंच आता खेदानं म्हणावं लागतंय. कालांतरानं युद्ध संपेल, सर्वोच्च नेते शांतता करार झाल्यावर हात मिळवतील; पण सामान्यांच्या हातातून वेळ आणि बरंच काही निसटून गेलं असेल.

खरं तर हे जग काही मूठभर व्यापारी चालवतात. त्यांना पक्कं ठाऊक आहे की काय विकायचंय. कशातून नफा कमवायचा आहे. उद्यापासून जर जगभरातील सर्व युद्ध थांबली तर बंदुकांना, रायफलींना, रणगाड्यांना काही वर्षांनी गंज चढेल. त्यांच्या आतली स्प्रिंग जाम होईल. काडतुसामधल्या दारूची राख मातीत मिसळेल. हॅन्ड ग्रेनेडला पाखरं अननस समजतील. कदाचित बंकरमध्येच मुंग्याचं वारूळ तयार होईल. ड्रोन्सऐवजी फक्त रंगीबेरंगी पतंगच आकाशात मुक्तपणे उडतील. कवी दासू वैद्य यांनी एका कवितेत लिहिलंच आहे की,

‘बंदुकीच्या निळकांडीत

चिमणीनं करावा खोपा,

बॉम्बचे व्हावेत रंगीबेरंगी फुगे

झेंड्यांनी दाखवावी दिशा फक्त वाऱ्याची’

खरंच असं घडलं तर जग किती सुंदर होईल. हीच विश्वशांतीची प्रार्थना ठरो! पण त्याकरिता युद्धाची नव्हे, तर जगाला बुद्धाची आत्यन्तिक गरज आहे!

ईमेल : geeteshshinde@gmail.com

(लेखक हे युवा कवी, अनुवादक, संपादक आहेत.)

T20 Final साठी रेल्वेची खास सोय; मुंबई-पुण्याहून अहमदाबादसाठी स्पेशल ट्रेन, वाचा वेळापत्रक

किचन बजेट बिघडणार! घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागला; नवे दर आजपासून लागू

महाबळेश्वरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; वन विभागाने केली सात जणांना अटक

ठाणेकरांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर ३१ मार्चपर्यंत वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?

अटल सेतू परिसरात तिसरी, तर पालघरमध्ये चौथी मुंबई वसवणार; मुंबईसह पुणे आणि नागपूरमध्ये मेट्रो विस्तारणार- मुख्यमंत्री