संपादकीय

जनतेमध्ये जागरूकता आवश्यक

जनसामान्यांच्या हिताच्या मुद्द्यावर आरएसएसचे मौन आहे. देशाच्या सरन्यायाधीशांच्या अंगावर बूट फेकण्यात आला, त्याबाबतही आरएसएस गप्प आहे. शताब्दीनिमित्त होणाऱ्या आरएसएसच्या संचलनाला मुंबईत रमाबाई नगरमध्ये विरोध करण्यात आला.

नवशक्ती Web Desk

लक्षवेधी

डॉ. संजय मंगला गोपाळ

जनसामान्यांच्या हिताच्या मुद्द्यावर आरएसएसचे मौन आहे. देशाच्या सरन्यायाधीशांच्या अंगावर बूट फेकण्यात आला, त्याबाबतही आरएसएस गप्प आहे. शताब्दीनिमित्त होणाऱ्या आरएसएसच्या संचलनाला मुंबईत रमाबाई नगरमध्ये विरोध करण्यात आला.

सर्वसामान्य जनतेने दसरा-दिवाळीच्या काळात आपली रोजची दगदग आणि तक्रारी बाजूला ठेवून मित्रपरिवारासोबत सण साजरे केले. जनता आपल्यातील चांगुलपणा, धार्मिकता सहजपणे जगत असताना, हितसंबंधी घटक मात्र आजूबाजूचे राजकीय, सामाजिक वातावरण बिघडवण्याचे तंत्र सणासुदीच्या काळातही सुरू ठेवताना दिसत आहेत. यंदा २ ऑक्टोबरच्या गांधी जयंतीच्याच दिवशी दसरा सण होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-आरएसएसची शताब्दीही त्याच दिवशी साजरी होत होती. त्यामुळे संघ स्वयंसेवकांची स्थिती, ‘नाही आनंदा तोटा’ अशी झाली असणार. काही लोक आपला आनंद इतरांसोबत वाटून घेतात. माणसा-माणसात ‘आपण’ आणि ‘ते’ अशी विभागणी करणाऱ्या आरएसएसच्या लोकांना मात्र आनंदाचा उन्माद चढत असावा. पुण्यातील भरवस्तीत दसऱ्याच्या दिवशी घडलेली पुढील घटना तरी हेच दाखवते.

पुण्यात जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय- एनएपीएमच्या सद‌्भाव मंचाच्या कार्यकर्त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात महात्मा जोतिराव फुल्यांच्या वाड्यानजीकच्या घोरपडे पेठेतील चांदतारा चौकामध्ये २ ऑक्टोबरला तिथलेच स्थानिक रहिवाशी असणारे फरीद शेख आणि त्यांचा मुलगा फैजान शेख यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. रात्रौ सव्वाआठच्या दरम्यान चांदतारा चौकात जिथे फरीद शेख उभे होते, तिथे वीस-पंचवीसजण संघाच्या गणवेशात लाठ्याकाठ्यांसह आले आणि ‘चला रे यां....ना मारलंच पाहिजे’ असं म्हणून फरीद शेख यांच्यावर रॉड आणि काठीने प्रहार करायला सुरुवात केली. फरीद शेख यांच्या विहीणबाई फैमिदा शेख यांनी मध्ये पडून त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण या मारहाणीत त्यांच्या डोक्याला मोठी इजा झाली. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना फैमिदा शेख यांनाही काठीने मारण्यात आले. फरीद शेख खाली पडून बेशुद्ध अवस्थेत गेल्यानंतर त्यांना वाचवायला आलेला फैजान शेख यालाही त्यांनी रॉड आणि काठीने मारहाण केली. त्यांनी कशीबशी एक रिक्षा थांबवली. त्याच्यामध्ये रक्तबंबाळ असलेल्या फैजानने वडील फरीद शेख यांना टाकले आणि ससून हॉस्पिटलच्या दिशेने पळ काढला. फैमिदा शेख आणि त्यांचे पती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता त्यांच्या आधीच तिथे असलेल्या आरोपींनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केलेली दिसली. त्यामध्ये त्यांनी फरीद शेख यांच्यावर ॲट्रॉसिटी लावली, तसेच महिलांची छेडखानी केल्याचे तक्रारीत म्हटले. फैमिदा शेख आणि त्यांचे पती, ‘आमची तक्रार घ्या’ म्हणून विनंती करत असताना, त्यांना बाहेर बसवले होते. तक्रार दाखल करून घ्या, असे लावून धरले तरीसुद्धा पोलीस त्यांनाच वेगवेगळे प्रश्न विचारत होते. पण त्यांची तक्रार लिखित स्वरूपात घेतली जात नव्हती. दोन-चार दिवसांनी मुंबईमधून त्यांचा एक नातेवाईक ज्याला या कायद्यासंदर्भात सगळी माहिती आहे तो आला, पोलिसांशी बोलला आणि त्याने त्यांना तक्रार घ्यायला लावली. पोलिसांनी तक्रार लिहून घेतली. मात्र अद्यापही आरोपी व त्याच्यासोबत सामील असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला अटक झालेली नाही. तिथे ससून हॉस्पिटलमध्ये फरीद शेख यांच्यावर ब्रेन सर्जरी करावी लागली. ते आयसीयूमध्ये आहेत. त्यांची तब्येत चिंताजनक आहे!

१९४८ साली महात्मा गांधीजींचा निर्घृण खून केला गेल्यापासून, दरवर्षी २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि काही वर्षांनंतर ‘जय जवान-जय किसान’चा नारा बुलंद करणारे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्यांची जयंती एकत्रितरीत्या साजरी होऊ लागली. गांधीजी व शास्त्रीजींच्या विचारांना उजाळा देत, त्यापासून प्रेरणा घेणारे कार्यक्रम शासकीय आणि स्वयंसेवी संघटनांच्या पातळीवर होत राहिले. यंदा मात्र आरएसएस विचारांच्या सत्ताधाऱ्यांनी, गेल्या १०० वर्षांत देशातील कायद्यांनुसार नोंदणीही न केलेल्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अवास्तव गौरवासाठी २ ऑक्टोबरचा गैरवापर केला. स्वातंत्र्यलढ्यात काडीचेही योगदान न देणाऱ्या, किंबहुना त्या लढ्यास आणि त्या लढ्यातून साकारलेल्या संविधान, तिरंगा राष्ट्रध्वज आदींना त्यावेळपासूनच विरोध करणाऱ्या आरएसएसच्या शताब्दीनिमित्त टपाल तिकीट व अशुद्ध लेखन असलेले नाणे प्रसारित करण्यात आले. त्यावर भारतीय ध्वजाच्या जागी भलताच ध्वज फडकावण्याचा अचाट प्रकारही सरकारने बिनदिक्कतपणे केला.

शताब्दीनिमित्त आरएसएसच्या लोकांनी लाठ्या सरसावत जागोजागी संचलन केले. मुंबईत रमाबाई आंबेडकर नगरच्या जवळून जाणाऱ्या या संचलनाला आरएसएस मुर्दाबादच्या प्रतिरोधाचा सामना करावा लागला. गोरेगावमध्येही आरएसएसच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजी नगरमध्ये अ-नोंदणीकृत आरएसएसच्या प्रचारासाठी सरकारी महाविद्यालयाच्या परिसरात बेकायदेशीर कार्यक्रम घेण्यास विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मारहाण करत अटक करण्याचे उफराटे प्रकार राज्यातील पोलिसांकडून केले गेले. वंचित बहुजन आघाडीने या विरुद्ध आवाज उठवत प्रचंड मोर्चा संघटित केला. मोर्चाच्या वतीने आणलेल्या भारतीय संविधान, राष्ट्राचा तिरंगा झेंडा व संस्था नोंदणी कायद्याची प्रत या भेटी संघाच्या प्रतिनिधींनी स्वीकारल्या नाहीत व आजही आम्ही संविधान व कायदा मानत नसल्याचे दाखवून दिले!

आरएसएसच्या विचाराचे लोक आज शासन प्रशासनात अनेक मोक्याच्या जागांवर नेमण्यात आलेले आहेत. साताऱ्यात एका महिला डॉक्टरने पोलीस उपनिरीक्षकाच्या शारीरिक आणि मानसिक छळाला त्रासून आत्महत्या केली. चार वेळा बलात्कार आणि अन्य छळ होत असल्याच्या तक्रारीची वेळीच दखल न घेतल्याने व एका खासदाराच्या दबावात ही संतापजनक चालढकल करण्यात आल्याचे, स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. वेळीच गुन्हेगारांना जेरबंद न करता उलट सदर महिलाच खोटे वागत असल्याचा कांगावा पसरवला जातो आहे. याबाबतीत संघ विचारांच्या लोकांचे सोशल मीडिया व्यवस्थापन जोरात कामाला लागते! राज्याच्या गृहमंत्रीपदी संघ विचारांचे मुख्यमंत्री असताना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था भयानक बनली असून, गुन्हेगारांना या राज्यात खुलेआम संरक्षण मिळते आहे. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणातही याचीच प्रचिती येते आहे. संघ विचारांचे मंत्री व त्यांचे कार्यकर्ते धर्मदाय आयुक्तांच्या सहकार्याने विद्यार्थी वसतिगृहाची जमीन लुबाडण्याचे काम करण्यात गुंतल्याचा आरोप त्यांच्याच मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झाला. या साऱ्यावर जरब बसवण्याचे सोडून संघ विचारांचे राज्यपाल, ‘पंतप्रधान देवलोकातून अवतरले असून, त्यांचे धरतीवर अवतरणे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे’, असे म्हणत आहेत! जाती-धर्मात तेढ, अल्पसंख्यांकांवर हल्ले आणि स्त्रियांविरोधात अत्याचार या साऱ्यात वाढ, ही आजची राज्याची ओळख बनते आहे.

सामाजिक पर्यावरणाबरोबरच संघ विचारांच्या सत्ताधाऱ्यांकडून हवा-पाणी-निसर्ग संतुलन राखणाऱ्या पर्यावरणावरही दिवसाढवळ्या घाला घातला जातो आहे. मुंबईतून ठाण्यात वेगाने पोहोचण्यासाठीच्या पूर्व मुक्त महामार्गासाठी शेकडो झाडे तोडण्याचा प्रकार असो, नाहीतर मुंबईतल्याच पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या अजून एका लिंक रोडसाठीची झाडेतोड असो, प्रत्येक बाबतीत न्यायालयाची दारे ठोठवावी लागत आहेत. समृद्धी मार्गाच्या पांढऱ्या हत्तीनंतर शक्तिपीठ मार्गाला होणारा शेतकऱ्यांचा उग्र विरोधही सरकार समजून घ्यायला तयार नाही. प्रकल्प रद्द करण्याऐवजी, मार्गात बदल करून तोंडाला पाने पुसण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जनसामान्यांच्या हिताच्या या सगळ्या मुद्द्यांवर, आरएसएसच्या तोंडाला कुलूप! सनातन धर्म रक्षणाच्या नावाखाली थेट सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारणारी प्रवृत्ती सध्या फोफावते आहे व अशांना आरएसएस विचारांच्या केंद्र सरकारचेही संरक्षण आहे!

सेवाभावी प्रकल्पाचे व संकटाच्या वेळच्या मदतकार्याचे फोटो आणि व्हिडीओ हे आरएसएसचे दाखवायचे दात आहेत. देशातील सर्वधर्मसमन्वयाची संस्कृती नष्ट करून एकचालकानुवर्तीत्व लादणे, हाच आरएसएसचा मूळ आणि मुख्य अजेंडा आहे. शंभरीतील आरएसएस हे विसरलेली नाही. जनतेतही याबाबत जागरूकता आवश्यक आहे!

र्वसामान्य जनतेने दसरा-दिवाळीच्या काळात आपली रोजची दगदग आणि तक्रारी बाजूला ठेवून मित्रपरिवारासोबत सण साजरे केले. जनता आपल्यातील चांगुलपणा, धार्मिकता सहजपणे जगत असताना, हितसंबंधी घटक मात्र आजूबाजूचे राजकीय, सामाजिक वातावरण बिघडवण्याचे तंत्र सणासुदीच्या काळातही सुरू ठेवताना दिसत आहेत. यंदा २ ऑक्टोबरच्या गांधी जयंतीच्याच दिवशी दसरा सण होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-आरएसएसची शताब्दीही त्याच दिवशी साजरी होत होती. त्यामुळे संघ स्वयंसेवकांची स्थिती, ‘नाही आनंदा तोटा’ अशी झाली असणार. काही लोक आपला आनंद इतरांसोबत वाटून घेतात. माणसा-माणसात ‘आपण’ आणि ‘ते’ अशी विभागणी करणाऱ्या आरएसएसच्या लोकांना मात्र आनंदाचा उन्माद चढत असावा. पुण्यातील भरवस्तीत दसऱ्याच्या दिवशी घडलेली पुढील घटना तरी हेच दाखवते.

पुण्यात जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय- एनएपीएमच्या सद‌्भाव मंचाच्या कार्यकर्त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात महात्मा जोतिराव फुल्यांच्या वाड्यानजीकच्या घोरपडे पेठेतील चांदतारा चौकामध्ये २ ऑक्टोबरला तिथलेच स्थानिक रहिवाशी असणारे फरीद शेख आणि त्यांचा मुलगा फैजान शेख यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. रात्रौ सव्वाआठच्या दरम्यान चांदतारा चौकात जिथे फरीद शेख उभे होते, तिथे वीस-पंचवीसजण संघाच्या गणवेशात लाठ्याकाठ्यांसह आले आणि ‘चला रे यां....ना मारलंच पाहिजे’ असं म्हणून फरीद शेख यांच्यावर रॉड आणि काठीने प्रहार करायला सुरुवात केली. फरीद शेख यांच्या विहीणबाई फैमिदा शेख यांनी मध्ये पडून त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण या मारहाणीत त्यांच्या डोक्याला मोठी इजा झाली. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना फैमिदा शेख यांनाही काठीने मारण्यात आले. फरीद शेख खाली पडून बेशुद्ध अवस्थेत गेल्यानंतर त्यांना वाचवायला आलेला फैजान शेख यालाही त्यांनी रॉड आणि काठीने मारहाण केली. त्यांनी कशीबशी एक रिक्षा थांबवली. त्याच्यामध्ये रक्तबंबाळ असलेल्या फैजानने वडील फरीद शेख यांना टाकले आणि ससून हॉस्पिटलच्या दिशेने पळ काढला. फैमिदा शेख आणि त्यांचे पती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता त्यांच्या आधीच तिथे असलेल्या आरोपींनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केलेली दिसली. त्यामध्ये त्यांनी फरीद शेख यांच्यावर ॲट्रॉसिटी लावली, तसेच महिलांची छेडखानी केल्याचे तक्रारीत म्हटले. फैमिदा शेख आणि त्यांचे पती, ‘आमची तक्रार घ्या’ म्हणून विनंती करत असताना, त्यांना बाहेर बसवले होते. तक्रार दाखल करून घ्या, असे लावून धरले तरीसुद्धा पोलीस त्यांनाच वेगवेगळे प्रश्न विचारत होते. पण त्यांची तक्रार लिखित स्वरूपात घेतली जात नव्हती. दोन-चार दिवसांनी मुंबईमधून त्यांचा एक नातेवाईक ज्याला या कायद्यासंदर्भात सगळी माहिती आहे तो आला, पोलिसांशी बोलला आणि त्याने त्यांना तक्रार घ्यायला लावली. पोलिसांनी तक्रार लिहून घेतली. मात्र अद्यापही आरोपी व त्याच्यासोबत सामील असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला अटक झालेली नाही. तिथे ससून हॉस्पिटलमध्ये फरीद शेख यांच्यावर ब्रेन सर्जरी करावी लागली. ते आयसीयूमध्ये आहेत. त्यांची तब्येत चिंताजनक आहे!

१९४८ साली महात्मा गांधीजींचा निर्घृण खून केला गेल्यापासून, दरवर्षी २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि काही वर्षांनंतर ‘जय जवान-जय किसान’चा नारा बुलंद करणारे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्यांची जयंती एकत्रितरीत्या साजरी होऊ लागली. गांधीजी व शास्त्रीजींच्या विचारांना उजाळा देत, त्यापासून प्रेरणा घेणारे कार्यक्रम शासकीय आणि स्वयंसेवी संघटनांच्या पातळीवर होत राहिले. यंदा मात्र आरएसएस विचारांच्या सत्ताधाऱ्यांनी, गेल्या १०० वर्षांत देशातील कायद्यांनुसार नोंदणीही न केलेल्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अवास्तव गौरवासाठी २ ऑक्टोबरचा गैरवापर केला. स्वातंत्र्यलढ्यात काडीचेही योगदान न देणाऱ्या, किंबहुना त्या लढ्यास आणि त्या लढ्यातून साकारलेल्या संविधान, तिरंगा राष्ट्रध्वज आदींना त्यावेळपासूनच विरोध करणाऱ्या आरएसएसच्या शताब्दीनिमित्त टपाल तिकीट व अशुद्ध लेखन असलेले नाणे प्रसारित करण्यात आले. त्यावर भारतीय ध्वजाच्या जागी भलताच ध्वज फडकावण्याचा अचाट प्रकारही सरकारने बिनदिक्कतपणे केला.

शताब्दीनिमित्त आरएसएसच्या लोकांनी लाठ्या सरसावत जागोजागी संचलन केले. मुंबईत रमाबाई आंबेडकर नगरच्या जवळून जाणाऱ्या या संचलनाला आरएसएस मुर्दाबादच्या प्रतिरोधाचा सामना करावा लागला. गोरेगावमध्येही आरएसएसच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजी नगरमध्ये अ-नोंदणीकृत आरएसएसच्या प्रचारासाठी सरकारी महाविद्यालयाच्या परिसरात बेकायदेशीर कार्यक्रम घेण्यास विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मारहाण करत अटक करण्याचे उफराटे प्रकार राज्यातील पोलिसांकडून केले गेले. वंचित बहुजन आघाडीने या विरुद्ध आवाज उठवत प्रचंड मोर्चा संघटित केला. मोर्चाच्या वतीने आणलेल्या भारतीय संविधान, राष्ट्राचा तिरंगा झेंडा व संस्था नोंदणी कायद्याची प्रत या भेटी संघाच्या प्रतिनिधींनी स्वीकारल्या नाहीत व आजही आम्ही संविधान व कायदा मानत नसल्याचे दाखवून दिले!

आरएसएसच्या विचाराचे लोक आज शासन प्रशासनात अनेक मोक्याच्या जागांवर नेमण्यात आलेले आहेत. साताऱ्यात एका महिला डॉक्टरने पोलीस उपनिरीक्षकाच्या शारीरिक आणि मानसिक छळाला त्रासून आत्महत्या केली. चार वेळा बलात्कार आणि अन्य छळ होत असल्याच्या तक्रारीची वेळीच दखल न घेतल्याने व एका खासदाराच्या दबावात ही संतापजनक चालढकल करण्यात आल्याचे, स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. वेळीच गुन्हेगारांना जेरबंद न करता उलट सदर महिलाच खोटे वागत असल्याचा कांगावा पसरवला जातो आहे. याबाबतीत संघ विचारांच्या लोकांचे सोशल मीडिया व्यवस्थापन जोरात कामाला लागते! राज्याच्या गृहमंत्रीपदी संघ विचारांचे मुख्यमंत्री असताना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था भयानक बनली असून, गुन्हेगारांना या राज्यात खुलेआम संरक्षण मिळते आहे. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणातही याचीच प्रचिती येते आहे. संघ विचारांचे मंत्री व त्यांचे कार्यकर्ते धर्मदाय आयुक्तांच्या सहकार्याने विद्यार्थी वसतिगृहाची जमीन लुबाडण्याचे काम करण्यात गुंतल्याचा आरोप त्यांच्याच मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झाला. या साऱ्यावर जरब बसवण्याचे सोडून संघ विचारांचे राज्यपाल, ‘पंतप्रधान देवलोकातून अवतरले असून, त्यांचे धरतीवर अवतरणे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे’, असे म्हणत आहेत! जाती-धर्मात तेढ, अल्पसंख्यांकांवर हल्ले आणि स्त्रियांविरोधात अत्याचार या साऱ्यात वाढ, ही आजची राज्याची ओळख बनते आहे.

सामाजिक पर्यावरणाबरोबरच संघ विचारांच्या सत्ताधाऱ्यांकडून हवा-पाणी-निसर्ग संतुलन राखणाऱ्या पर्यावरणावरही दिवसाढवळ्या घाला घातला जातो आहे. मुंबईतून ठाण्यात वेगाने पोहोचण्यासाठीच्या पूर्व मुक्त महामार्गासाठी शेकडो झाडे तोडण्याचा प्रकार असो, नाहीतर मुंबईतल्याच पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या अजून एका लिंक रोडसाठीची झाडेतोड असो, प्रत्येक बाबतीत न्यायालयाची दारे ठोठवावी लागत आहेत. समृद्धी मार्गाच्या पांढऱ्या हत्तीनंतर शक्तिपीठ मार्गाला होणारा शेतकऱ्यांचा उग्र विरोधही सरकार समजून घ्यायला तयार नाही. प्रकल्प रद्द करण्याऐवजी, मार्गात बदल करून तोंडाला पाने पुसण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जनसामान्यांच्या हिताच्या या सगळ्या मुद्द्यांवर, आरएसएसच्या तोंडाला कुलूप! सनातन धर्म रक्षणाच्या नावाखाली थेट सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारणारी प्रवृत्ती सध्या फोफावते आहे व अशांना आरएसएस विचारांच्या केंद्र सरकारचेही संरक्षण आहे!

सेवाभावी प्रकल्पाचे व संकटाच्या वेळच्या मदतकार्याचे फोटो आणि व्हिडीओ हे आरएसएसचे दाखवायचे दात आहेत. देशातील सर्वधर्मसमन्वयाची संस्कृती नष्ट करून एकचालकानुवर्तीत्व लादणे, हाच आरएसएसचा मूळ आणि मुख्य अजेंडा आहे. शंभरीतील आरएसएस हे विसरलेली नाही. जनतेतही याबाबत जागरूकता आवश्यक आहे!

जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाच्या राष्ट्रीय कार्यगटाचे सदस्य 

sansahil@gmail.com

मुंबईत परतीच्या पावसावर चक्रीवादळाचं सावट! पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट’

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ८व्या वेतन आयोगाच्या अटींना केंद्र सरकारची मंजूरी

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा पलटवार; हिकारू नाकामुराने केलेल्या अपमानाचा पटलावरच घेतला बदला

माज उतरला, माही खान वठणीवर आला! मनसेच्या इशाऱ्यानंतर काही तासांतच "मुंबई मेरी जान...जय महाराष्ट्र" म्हणत मागितली माफी

पंतप्रधान मोदी उद्या मुंबईत, IMW ला लावणार हजेरी; वाहतुकीत मोठे बदल - कोणते रस्ते बंद, कोणते पर्यायी मार्ग?