पावसाळ्यात ही ५ फळं आरोग्यासाठी फायदेशीर canva
फोटो

Monsoon Tips : पावसाळ्यात ही ५ फळं आरोग्यासाठी फायदेशीर, इंफेक्शनसह डायजेशनची समस्याही होते दूर

Pooja Pawar
पपई : पपई ही प्रत्येक ऋतूमध्ये बाजारात उपलब्ध असते तसेच प्रत्येक ऋतूमध्ये याचे सेवन आरोग्यदायी समजले जाते. यामुळे पचनक्रिया चांगली राहते तसेच यात असलेले व्हिटॅमिन सी आणि ए त्वचेसाठी चांगलं ठरतं.
सफरचंद : पावसाळ्यात सफरचंद खाणं फायदेशीर मानलं जातं. सफरचंदमध्ये भरपूर फायबर आढळते ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. तसेच यात आढळणारे अँटी ऑक्सिडंट्स इंफेक्शन पासून बचाव करतात.
नाशपती : नाशपती या फळात फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. नाशपती शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते तसेच हे फळ अँटी ऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत मानला जातो. नाशपतीच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते.
जांभूळ : पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर बाजारात जांभळाची आवक होत असते. जांभळामध्ये अँटी ऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन सी, फायबर इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी तसेच पचनक्रिया चांगली राहण्यासाठी जांभळाचे सेवन फायदेशीर ठरते. तसेच जांभूळ हे फळ डायबेटिज नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.
आंबा : पावसाळ्यात फळांचा राजा समजला जाणारा आंब्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. आंब्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळतात. हे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यात फायदेशीर ठरतात. आंबा हा त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर समजला जातो. पावसाळ्यात आंबा खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत