पहाटेपासूनच विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. लाखोंच्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांनी संयमाने दर्शन घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. पहाटे पारंपरिक विधींनुसार हा सोहळा पार पडला.
यंदा धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने या दाम्पत्याला मानाच्या वारकऱ्यांचा सन्मान मिळाला. महापूजेनंतर त्यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
पहाटेपासूनच विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. लाखोंच्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांनी संयमाने दर्शन घेतले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांच्या आकर्षक सजावटीने आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाले. आषाढी एकादशीचा सोहळा अधिकच भक्तिमय झाला.
चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि अभंगांनी परिसर दुमदुमून गेला.
महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही दिली. भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात पार पडला. भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम पंढरपुरात अनुभवायला मिळाला.