फोटो

आषाढी एकादशी २०२५ : पंढरीच्या विठुराया चरणी मुख्यमंत्री फडणवीस सपत्नीक नतमस्तक; पहा फोटो

वारकरी परंपरेचा सन्मान राखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाशिकमधील मानाचे वारकरी दाम्पत्य कैलास व कल्पना उगले यांनी संयुक्तपणे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली.

नेहा जाधव - तांबे
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली.
यावर्षी या पूजेचा मान वारकरी दाम्पत्य कैलास उगले आणि कल्पना उगले यांना मिळाला.
पांडुरंगाच्या चरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या कल्याणासाठी व बळीराजाच्या समृद्धीसाठी साकडे घातले.
पहाटे ३ वाजता श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कुटुंबासह आणि नाशिकमधील मानाचे वारकरी दाम्पत्य कैलास व कल्पना उगले यांच्या समवेत रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी गेले.
या शासकीय महापूजेत श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींना अभिषेक, पूजन आणि मंगल आरती करण्यात येते.
या शासकीय पूजेदरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगीही श्रद्धेने सहभागी झाल्या.
शासकीय महापूजेनंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

आता रेल्वे डब्यांमध्ये कॅमेरे बसवणार

उज्ज्वल निकम राज्यसभेसाठी नामनिर्देशित; राष्ट्रपतींनी पाच सदस्यांना केले नियुक्त

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासले! छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख भोवला