फोटो

सीताफळ खाण्याचे 'हे' गुणकारी फायदे जाणून घ्या

Swapnil S
सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असणाऱ्या सीताफळाचे खालील फायदे नक्की वाचा.
सीताफळामध्ये व्हिटामिन बी-6चं प्रमाणात जास्त असतं. त्यामुळे अस्थमाचा त्रास रोखण्यात मदत होते. हृदयाचे त्रास असणाऱ्यांनी सीताफळ नियमित खावे. हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ हे अतिशय फायदेशीर आहे.
अतिसार झाला असेल तर सीताफळाचा रस फायदेशीर असतो.
कमी रक्तदाब आणि मधुमेह रूग्णांसाठी सीताफळ खूप फायदेशीर आहे.
सीताफळामध्ये तांबे-लोहं असल्यामुळे त्याचा गर्भवती महिलांसाठी देखील खूप फायदा आहे. त्याच्या आहारामुळे गर्भधारणेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होतात.
शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते.

Weather Update : अर्ध्या देशात पुढील ६ दिवस उष्णतेची लाट

रेबीजग्रस्त, गंभीर आजारी कुत्र्यांना मारण्यास परवानगी; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, सर्व याचिका फेटाळल्या

अणुऊर्जा प्रकल्पांचा धमाका; २५ हजार ४०० मेगावॉट क्षमता, १ लाख २३ हजारांना रोजगार

पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लिटर ९० पैशांची वाढ; पाच दिवसांतील दुसरी दरवाढ

भोंदू अशोक खरात प्रकरण : खरात ED च्या ताब्यात, चौकशीसाठी मुंबईला