बद्धकोष्ठतेचा त्रास ही आज एक सामान्य समस्या बनली आहे. अनेकांना हा त्रास होतो. काही साध्या सोप्या गोष्टींद्वारे तुम्ही यावर सहज मात करू शकता. यासाठी डॉ. नेने यांनी या खास टिप्स सांगितल्या आहेत. जेव्हा तुमचे शरीर मंद होते आणि आतड्यांची हालचाल होत नाही किंवा क्वचितच होते तेव्हा बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.जेव्हा तुमच्या आहारात फायबर कमी असते, तुम्ही पाणी खूप कमी पिता तसेच खूप वेळ तुम्ही शौचावर नियंत्रण ठेवता तेव्हा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी अधिकाधिक फायबरयुक्त आहार घ्या. जसे की हिरव्या पालेभाज्या, धान्य इत्यादी...भरपूर पाणी पिणे हे आतड्यांसाठी सर्वोत्तम असते. यामुळे मल कठीण होत नाही, तसेच ते पुढे ढकलण्यासाठी मदत मिळते. लवकर उठा आणि व्यायाम करा - नेने यांनी सांगितले की व्यायाम हे काही फक्त अॅब्ज बनवण्यासाठीच करायचे नसते तर ती एक नियमित सवय बनायला हवी.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)