Eknath Shinde - एकनाथ शिंदे @mieknathshinde
फोटो

DCM 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन' एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छकाने दिली 'खास' भेट; सोशल मीडिया पोस्टवर शिंदे म्हणाले...

Kkhushi Niramish
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाणे येथील शुभ-दीप निवासस्थानी पत्नी लता आणि सून वृषाली यांनी औक्षण करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कुटूंबियांच्या साथीने नातवाच्या हातून केक कापून एकनाथ शिंदे यांनी वाढदिवस साजरा केला . यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू, माझे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, नातू रुद्रांश आणि शिंदे कुटूंबातील सर्व सदस्य उपस्थित होते, असे शिंदे यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
आसामचे मुख्यमंत्री हेमंता विश्व शर्मा यांनी एकनाथ शिंदे शुभेच्छा दिल्या. सोशल मीडिया पोस्टवर म्हटले, महाराष्ट्रातील लोकांप्रती शिंदे यांची प्रामाणिकता आणि समर्पण खरोखरच प्रशंसनीय आहे. त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी माँ कामाख्या आणि श्रीमंता शंकरदेव यांना प्रार्थना.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी तुम जिओ हजारो साल हे गाणे गात स्पेशल व्हिडिओ संदेशाद्वारे एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कॉमन मॅन का हाथ एकनाथ शिंदें के साथ... एकनाथ शिंदे यांना त्यांच्या एका शुभेच्छुकाकडून एक अतिशय खास अशी भेट वस्तू मिळाली. याविषयी शिंदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये खास उल्लेख केला. ते म्हणाले, ''मुख्यमंत्री असताना मी नेहमी म्हणायचो की मी 'सीएम' म्हणजे 'मुख्यमंत्री' नसून #कॉमन_मॅन आहे तर उपमुख्यमंत्री म्हणजे डिसीएम झाल्यावर मी डीसीएम म्हणजे मी 'डेडीकेटेड टू कॉमन मॅन' आहे असं सांगू लागलो. आज माझ्या वाढदिवसानिमित्त एका सहृदाने मला ही अनोखी भेट देऊ केली. ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून जन्म घेतलेल्या 'कॉमन मॅन'ने मोठ्या विश्वासाने माझ्या खांद्यावर हात टाकला आहे अशी ही प्रतिमा आहे. कॉमन मॅनने माझ्या खांद्यावर विश्वासाने टाकलेला हात, हीच माझी त्याच्यासाठी सदैव कार्यरत राहण्यामागची प्रेरणा आहे. धन्यवाद मित्रा... तुझा विश्वासु, एकनाथ शिंदे डिसीएम अर्थात 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'...''
एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे येथील किसननगर येथील शिवसेना शाखेत कार्यकर्ते परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. याच शाखेतून एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह देशभरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातून आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत