FreePIk
फोटो

रोज जिरे पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत?

वजन नियंत्रित करण्यापासून ते पचन प्रक्रिया सुधारण्यापर्यंत जिरे कसे फायदेशीर आहेत ते जाणून घेऊयात.

Swapnil S

आपल्या प्रत्येकाच्या घरी रोेजच्या बऱ्याच पदार्थांमध्ये जिऱ्याचा वापर होतच असतो. तेलामध्ये फोडणीसाठी जिरे टाकल्यानंतर जो वास येतो त्यावरूनच समजून जाते की जेवण आता खूप रुचकर बनणार आहे. जेवणाच्या चवीसाठी जिरे उपयुक्त आहेत पण त्याशिवाय आरोग्यासाठी देखील जिरे खूप फायदेशीर आहे. वजन कमी करण्यापासून ते पचन प्रक्रिया सुधारण्यापर्यंत जिरे कसे फायदेशीर आहेत तसेच रोज जिरे पाणी पिल्याने आपल्या शरिराला काय फायदे होेतात ते आपण जाणून घेऊयात.

पचन सुधारते

जिरे पाणी पचनक्रिया सुधारते. गॅस, अपचन समस्या दूर करण्यास मदत करते. यामुळे पोटाच्य़ा आणि गॅस्ट्रिक समस्या कमी होतात.

वजन कमी करण्यास मदत

जिरे पाणी मेटाबोलिजमला गती देते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. यामध्ये काही प्रमाणात फायबर्स आणि एंटीऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात.

त्वचेसाठी फायदेशीर

जिरे पाणी त्वचेला उजळवते. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडन्ट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म त्वचेला तजेलदार बनवतात.

सर्दी-ताप कमी करते

जिरे पाणी सर्दी आणि जुलाब यावरही प्रभावी आहे. ते शरीराचे तापमान नियंत्रित करते आणि विविध आाजारंची लागन होण्यापासून बचावते.

मधुमेह नियंत्रण

जिरे पाणी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींना जिरे पाणी फायदेशीर आहे.

रोज संध्याकाळी झोपताना एक ग्लास पाण्यामध्ये जिरे भिजवत ठेऊन सकाळी ते पाणी पिल्यानंतर आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला