फोटो सौ : Meta AI
फोटो

जिम करताय पण महागडे प्रोटीन परवडत नाहीत? मग घरच्या घरीच बनवा 'हे' प्रोटीन, मसल बनतील एकदम पॉवरफुल

Swapnil S
हल्ली जिमला जाण्याआधी आणि जिमवरुन आल्यानंतर मसल वाढवण्यासाठी प्रोटीन खाणे खूप महत्त्वाचे समजले जाते. पण महागड्या प्रोटीन पावडर जर तुम्हाला परवडत नसतील तर घरच्या घरी तुम्ही पौष्टीक प्रोटीन बनवू शकता.
पीनट बटर आणि केळीचा स्मूदी – पीनट बटर आणि केळं यांचे एकत्रितपणे सेवन केल्याने प्रोटीन आणि ऊर्जा मिळते, जे जिम वर्कआउटसाठी आवश्यक आहे. यामध्ये प्रोटीन पावडर घालून आणखी फायदेशीर बनवता येते.
अंड्याचे व्हाइट ऑम्लेट – अंड्यातील पांढरा भाग खूप प्रोटीनयुक्त असतो, ज्यामुळे स्नायूंना ताकद मिळते. हा भाज्यांसोबत एक चांगला नाश्ता किंवा लंच पर्याय आहे. ऑम्लेट बनवताना केवळ पांढऱ्या भागाचाच वापर करावा. कारण पिवळ्या भागात फॅट्स जास्त असतात, ज्यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढते.
दही आणि नट्स – दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स असतात, जे पचनसंस्थेला मदत करतात. तसेच दही आणि नट्स (ड्रायफ्रूट्स किंवा शेंगदाणे वगैरे) फळांसोबत सेवन केल्याने जास्त ऊर्जा मिळते.
चिया सीड्स - चिया सीड्समध्ये प्रोटीन, फायबर्स आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आहेत, जे शरीराच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात. चिया सीड्स भरपूर प्रोटीन देतातच व स्नायू बळकट करण्यासाठीही उपयुक्त आहेत.
टोफू आणि भाज्यांचे स्टिर-फ्राय – टोफू म्हणजेच सोयाबीन पासून बनवलेले सोयोपनीर. हा एक उत्कृष्ट प्रोटीन स्त्रोत आहे, टोफूला भाज्यांसोबत खाल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते. तसेच पचनासही मदत होते आणि उर्जा मिळते.
प्रोटीन शेक –केळं, बदाम आणि दूध तीन पदार्थ एकत्र करुन बनवलेला शेक जिम वर्कआउटसाठी उपयुक्त प्रोटीन शेक आहे, हा शेक स्नायूंना बळकट करतो.
घरगुती प्रोटीन बार्स – ओट्स आणि पीनट बटर यांचं मिश्रण करून घरच्या घरी प्रोटीन बार्स बनवता येतात, जे जिमसाठी उत्तम स्नॅक असतात.
चणाडाळ – चणाडाळ प्रोटीनने भरलेली असते. चणाडाळीमध्ये हेल्दी फॅटी अॅसिड्स आणि फायबर्स असतात. हा एक पोटभर आणि पोषणदायक आहार आहे. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते. )

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक