फोटो सौ : FPJ
फोटो

केसगळती थांबतच नाही? मग घरच्या घरी करा 'हे' साधे आणि सोपे उपाय

Swapnil S
आजच्या धकाधकीच्या जीवनात केसांचे आरोग्य राखणे हे एक मोठे आव्हान आहे. प्रदूषण, अनियमित आहार, मानसिक ताणतणाव यामुळे केसांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक आणि घरगुती उपाय केसांच्या आरोग्यासाठी अधिक परिणामकारक आहेत. त्यासाठी घरच्या घरी काही प्रभावी उपाय तुम्ही करु शकता. पुढील उपाय तुमच्यासाठी फायदेशीर आहेत.
नारळ तेल : नारळ तेल केसांच्या मुळांना उत्तम पोषण देते. नारळ तेलाने नियमितपणे मालीश केल्याने केस गळती कमी होऊ शकते.
आलं आणि लिंबाचा रस : आलं आणि लिंबाचा रस एकत्र करून त्याचा प्रयोग केसांच्या मुळांवर करा. हे केस मजबूत ठेवण्यास मदत करतात.
आश्वगंधा : आश्वगंधा पाण्यात मिसळून किंवा कॅप्सूल म्हणून घेतल्याने शरीरातील ताण कमी होतो, ज्यामुळे केस गळतीवर नियंत्रण मिळवता येते.
मेथीचे दाणे : मेथीच्या दाण्याचे पाणी किंवा त्याचा लेप केसावर लावल्याने केस गळती कमी होऊ शकते. मेथीतील प्रोटीन आणि नॅट्रिशन केशांचा पोषण करतात.
तिळाचे तेल : तिळाचे तेल केसांच्या मुळांवर लावल्याने ते मजबुतीला मदत करते आणि केस गळती थांबवते.
कांद्याचा रस : कांद्याचा रस केसांच्या मुळांवर लावल्याने ते मजबूत होतात आणि गळती कमी होते. प्याजात असलेल्या सल्फरमुळे केसांची मुळे मजबूत होतात.
आहारातील बदल : प्रोटीनयुक्त, आयर्न, झिंक, आणि व्हिटॅमिन-सीने भरपूर असलेला आहार घेतल्याने केसांची वाढ सुधारते. अंडी, दूध, पालक, फळे आणि शाकाहारी पदार्थ यांचा समावेश करा.
योग आणि ध्यान : मानसिक ताण हा केस गळतीचे एक मोठे कारण असू शकते. योग आणि ध्यान करून ताण कमी करणे, केसांची गळती थांबवण्यासाठी उपयुक्त ठरते. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते. )

IIT Bombay मध्ये छतावरील पंख्यांऐवजी भिंतीवरचे पंखे

Jalgoan : विद्यार्थ्यांच्या मनात पेटणार ‘ज्योती’; २८ जिल्ह्यांतील १ हजार ८०० शाळांमध्ये लघुपट दाखवणार

छत्रपती संभाजीनगर : मुकुटबन-गडचांदूर रेल्वेमार्गासाठी ४९३ कोटींची मंजुरी

माझी प्रकृती उत्तम - सलमान खानचा खुलासा

हरित लवादाचे मोदी सरकारकडून खच्चीकरण; काँग्रेसचा आरोप, उद्योगांच्या बाजूने निकाल होत असल्याची तक्रार