छायाचित्र सौ. सर्व फोटो Freepik
फोटो

'या' चार फळांमधून मिळेल हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक Vitamin C

Kkhushi Niramish
आपल्या सर्व शारीरिक हालचालींसाठी हाडांचे आरोग्य चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे.
हाडांचे आरोग्य उत्तम असेल तर चालणे, उठणे, धावणे अशा क्रिया करताना आपल्याला त्रास होत नाही.
हाडांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी कॅल्शियमसह पोटॅशियम, मॅग्निशियम, जीवनसत्त्व ड यासह जीवनसत्त्व क हे देखील अतिशय महत्त्वाचे असते. जीवनसत्त्व क युक्त फळांचे सेवन करून आपण शरिराला याची पूर्तता करू शकतो.
आवळा हे बहुगुणी फळ असून हे जीवनसत्व क ने युक्त असे फळ आहे. आपण आवळ्याचे सेवन अनेक प्रकारे करू शकतो. आवळ्याचे मोरावळा, कॅन्डी, सुपारी, ज्यूस अशा वेगवेगळ्या पदार्थातून सेवन करू शकतो.
मोसंबी हे क जीवनसत्त्वाचे भंडार आहे. आपण अनेक वेळा पाहतो मोसंबीचे ज्यूस आजारी व्यक्तींना दिल्याने त्यांची तब्येत लगेच सुधारते.
मोसंबी प्रमाणेच संत्री हे फळ देखील जीवनसत्त्व क चे खूप मोठे स्रोत आहे. संत्र्याचा ज्यूस घेतल्याने शरीरात जीवनसत्त्व क ची उणीव भरून निघते.
किवी हे फळ मूळ भारतीय नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हे फळ आपल्या भारतीय बाजारांमध्ये सहजरित्या मिळते. तसेच सर्वांच्या परिचयाचे देखील झाले आहे. किवीमध्ये देखील जीवनसत्त्व क भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे याचा देखील आहारात समावेश केल्याने शरीराला क जीवनसत्त्वाची आपुर्ती होते.

Nerul–Mumbai Ferry : फक्त ३० मिनिटांत मुंबई! १५ डिसेंबरपासून नेरुळ-भाऊचा धक्का फेरी सुरू होणार; भाडे किती? जाणून घ्या डिटेल्स

Goa Nightclub Fire Update : लुथ्रा बंधू थायलंडच्या फुकेतमधून ताब्यात; भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम रवाना

लाज आणली! महिला डॉक्टरांचा स्पर्श व्हावा यासाठी आजारपणाचं नाटक; कॅनडात भारतीय वंशाच्या तरुणाला अटक

IND vs SA : सूर्यकुमारच्या कामगिरीची चिंता! भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मुल्लानपूर येथे रंगणार दुसरा टी-२० सामना

परदेशी वारीसाठी ६० कोटी रुपये जमा करा, अन्यथा बँक गॅरंटी द्या; राज कुंद्रा - शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाने सुनावले