फोटो

ब्लॅकहेडने त्रस्त आहात? 'या' दोन पदार्थांनी घरातच बनवा रिमुव्हर पॅक आणि मिळवा स्वच्छ त्वचा

Kkhushi Niramish
ब्लॅकहेड ही एक सामान्य सौंदर्य समस्या आहे. मात्र, अनेकांच्या ती नाकी नऊ आणते कारण हे ब्लॅकहेड रिमुव्ह करणं अतिशय त्रासदायक असतं.
ब्लॅकहेड ही समस्या अॅकने प्रकारातीलच एक आहे. ही समस्या त्वचेच्या खुल्या छिद्रांमध्ये तेल आणि मृतपेशी जमा झाल्याने निर्माण होते.
सामान्यपणे हे ब्लॅकहेड नाकावरील त्वचेवर जमा होतात. मात्र, काही जणांच्या नाकाच्या बाजूला, गालावर, कपाळावरही जमतात.
हे ब्लॅकहेड रिमुव्ह करण्यासाठी अनेक जण आपआपल्या पद्धतीने प्रयत्न करतात.
बाजारात यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॅकहेड रिमुव्हर पॅक मिळतात. ते लावून थोड्यावेळाने रिमुव्ह करायचे असते. मात्र, या प्रक्रियेत अनेक वेळा स्किन ओढली जाते.
ब्लॅकहेड रिमुव्ह करण्यासाठी तुम्ही घरातच उत्तम रिमुव्हर पॅक बनवू शकतात.
ब्लॅकहेड रिमुव्ह करण्यासाठी मध हे अत्यंत फायदेशीर असते. तसेच तुम्ही नैसर्गिक पद्धतीने ब्लॅकहेड रिमुव्ह करत असल्याने त्वचेला फायदा होतो.
ब्लॅकहेड रिमुव्ह करण्यासाठी मधात दालचिनी पावडर मिक्स करून छान पॅक तयार करता येतो. हा पॅक ज्या भागावर ब्लॅकहेड्स आहेत त्या भागावर लावा.
त्यावर कॉटनची व्हाईट स्ट्रिप लावा किमान १५ मिनिटे हा पॅक तसाच ठेवा. हा पॅक वाळल्यानंतर हळूहळू कॉटनस्ट्रिप काढून घ्या. तुमच्या त्वचेवरील ब्लॅकहेड्स निघून जातील. नंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video