आवळा हा अतिशय बहुगुणी आहे. आयुर्वेदात याचे मोठे महत्त्व सांगितले आहेत. विशेष करून त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आवळा सर्वोत्तम आहे. तसेच दीर्घकाळ तरुण राहण्यासाठी आवळ्याचे सेवन महत्त्वाचे मानले आहे. आवळा हा तुरट असल्याने अनेकांना तो खायला आवडत नाही. मात्र, आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ करून तुम्ही ते खाऊ शकता. आवळा उकळून खाऊ शकता. आवळा कॅन्डी हा आवळ्यापासून केला जाणारा लोकप्रिय पदार्थ आहे. आवळा कॅन्डी गुळ, साखर, मध यांचा उपयोग करून विविध प्रकारे बनवता येते.आवळा कडक उन्हात वाळवून त्याचा देखील उपयोग करता येतो. विशेष म्हणजे आवळ्याचा हंगाम नसताना सुका आवळा वापरता येतो.आवळा पावडर पाण्यात घालून ते पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगले असते. आवळ्यापासून अनेक पदार्थ बनवता येतात. त्यामध्ये आवळा बर्फी सारखे पदार्थ आपल्याला हवेहवेसे वाटतात.आवळ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये गोड पदार्थ देखील बनवता येतात. आवळ्यापासून तयार करण्यात येणारा मोरावळा हा देखील एक छान पारंपारिक पदार्थ आहे.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)