फोटो सौ : @Amarrrrz
फोटो

देशातली पहिली उडणारी टॅक्सी 'शून्य'ने वेधले लक्ष...बंगळुरूच्या ट्रॅफिक जॅमवर 'फ्लाइंग टॅक्सी'चा जालीम उपाय!

Krantee V. Kale
सरला एव्हिएशनच्या भविष्यातील एअर टॅक्सीला एरो शोमध्ये विमानांच्या गर्दीत आपली ओळख मिळवता आली नाही. मात्र, ‘इन्व्हेस्ट कर्नाटक-२०२५’ या शिखर परिषदेत एअर टॅक्सी ‘शून्य’च्या प्रतिकृतीने (प्रोटोटाइप) सर्वांचे लक्ष वेधून घेतले. देशातल्या या पहिल्या उडणाऱ्या टॅक्सीच्या प्रोटोटाइपभोवती लोक माहिती घेण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी जमले होते.
बंगळुरूच्या या बहुप्रतीक्षित कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सरला एव्हिएशनच्या संस्थापकपैकी एक असलेला दिनेश पाहुण्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देत होता. पाहुण्यांना देता देता माझी सर्व कार्डे संपली, असे त्याने सांगितले.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एअर टॅक्सीची बातमी बंगळुरूत आली होती. तेव्हा आणेकल तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक सिटीहून विमानतळापर्यंतचा प्रवास १९ मिनीटांत व ९०० रुपयात होऊ शकेल,असे म्हटले होते. ही बातमी तेव्हा बंगळुरूत चेष्टेचा विषय बनली होती.
सध्या रस्त्याने विमानतळापर्यंत पोहोचायला दोन तास लागतात. तसेच एअर टॅक्सीच्या दरांबाबतही अनेक बंगळुरूवासीयांचा विश्वास बसत नव्हता. कारण कॅबने विमानतळावर जाण्याचा किमान एक हजार रुपये खर्च होतो.
सरला एव्हिएशनचे दिनेश यांनी सांगितले की, कंपनीला अद्याप नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून (डीजीसीए) मंजुरी मिळालेली नाही. आम्हाला मंजुरी मिळाल्यास आमच्या ताफ्यातील दोन विमाने आम्ही ताबडतोब सुरू करतो, असे त्यांनी सांगितलं. ही मंजुरी मिळवण्यास अंदाजे १८ महिने लागतील.
या विमानातून एकावेळी सहा प्रवाशांना नेता येऊ शकते. याची कमाल वजन क्षमता ६८० किलो आहे. याची गती २५० किमी/तासापर्यंत पोहोचू शकते.
त्याला उतरण्यासाठी किंवा उड्डाण करण्यासाठी फक्त २ हजार चौ.फू. ची जागा आवश्यक आहे, असे दिनेश म्हणाले. कंपनी यंदा आणखी चार विमाने ताफ्यात आणण्याचा विचार करत आहे.
हे विमान २० ते ३० किमीच्या लहान प्रवासासाठी तयार केले आहे. ज्यामुळे शहरातील गर्दीच्या भागातील प्रवासाचा वेळ कमी होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. इन्वेस्ट कर्नाटक-२०२५ या परिषदेत, १४ फेब्रुवारीपर्यंत एअर टॅक्सीचे प्रदर्शन ठेवले आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री