तणावमुक्त आयुष्य हवे? घरात करा 'हे' सोपे बदल! छायाचित्र : कॅनव्हा
फोटो

Mental Peace Tips : तणावमुक्त आयुष्य हवे? घरात करा 'हे' सोपे बदल!

कधी कधी तणावमुक्त राहणे हे आपल्या घराच्या वातावरणावर अवलंबून असते. काही छोटे बदल करून आपण घरात आणि मनात शांतता निर्माण करू शकतो. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत अनेक कामे करतो, पण घरातील अस्वच्छता आपोआप दुर्लक्ष होते.

Mayuri Gawade

आपल्या दैनंदिन जीवनात तणाव हा नित्यसाथीचा भाग बनला आहे. काम, घरकाम, जबाबदाऱ्या, या सगळ्यामुळे मन सतत व्यस्त राहते. अनेकदा आपण औषधांचा विचार करतो, योगा किंवा ध्यान देखील करतो, पण बऱ्याचदा तणावमुक्त राहणे हे आपल्या घराच्या वातावरणावर अवलंबून असते. घरातच काही छोटे बदल करून तुम्हाला मनःशांती तर मिळेलच शिवाय तणावमुक्त आयुष्य जगण्यासही मदत होईल. चला तर मग जाणून घेऊया...

१. वेळोवेळी साफसफाईची आवश्यकता

सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण अनेक कामे करतो, पण घरातील अस्वच्छतेकडे आपोआप दुर्लक्ष होते. घरातील धूळ, कचरा किंवा अस्वच्छता आपल्याला मानसिकदृष्ट्या तणावित करते. स्वच्छ आणि नीटनेटके वातावरण आपल्याला ताजेतवाने ठेवते. एखादे काम करण्याचा हुरूपही कायम राहतो. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ, नीटनेटके ठेवावे.

२. स्वतःसाठी जागा तयार करा

योगा, गिटार वाजवणे, ध्यान किंवा चित्रकला यांसारखे छंद आपल्याला मानसिक शांती देतात. अनेकदा छोटे घर असल्यामुळे किंवा खूप सामानामुळे घरात स्वतःसाठी जागा मिळणे कठीण असते. त्यामुळे घरात एक कोपरा फक्त स्वतःसाठी राखून ठेवा. ही जागा तुमच्या आवडीच्या छंदांसाठी वापरा, त्यामुळे तुम्ही व्यस्त तर राहालच पण मन देखील प्रसन्न राहील आणि तणाव दूर होईल.

३. घर सजवा आणि नवा लूक द्या

घरातील लहान-सहान वस्तूंची जागा बदलवून, रंगरंगोटी करून किंवा एखाद्या कोपऱ्याला नवीन लूक देऊन तुम्ही घरात नाविन्यपणा आणू शकता. सोफा, खुर्ची किंवा एखाद्या लहानश्या सजावटीच्या वस्तूची जागा बदलल्याने वातावरण बदलते आणि मनाला ताजगी मिळते.

४. अरोमाथेरपी वापरा

सुगंधी मेणबत्त्या, अगरबत्ती किंवा सुवासिक लाकूड वापरणे तणाव कमी करण्यासाठी प्रभावी आहे. अरोमाथेरपीच्या सुगंधांमुळे घरातील वातावरण शांत आणि सुंदर बनते. बाजारात अनेक सुगंधी उत्पादनं उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर करून घरात आल्हाददायी वातावरण तयार करता येते.

५. फेंगशुईच्या वस्तू घरी ठेवा

फेंगशुई हा एक प्राचीन उपाय आहे ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. घोड्याचा पुतळा, लाफिंग बुद्धा किंवा विंड चाइम्स लावल्याने घरात आनंद आणि समाधानाची भावना निर्माण होते. सजावटीसाठी सुद्धा हे अतिशय आकर्षक असतात.

६. संगीत थेरपी

आवडती गाणी ऐकणे किंवा वाद्य वाजवणे हे मनाला आनंद देणारे छंद आहेत. आवडतं गाणं गुणगुणल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि मूड सुधारतो.

७. घरातील झाडं

घरातील झाडे मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. एरिका पाम, पाइन प्लांट, एलोवेरा, स्पायडर प्लांट यासारखी झाडे घरात ठेवली तर घरातील हवा शुद्ध राहते आणि मनाला शांती मिळते. ही झाडे घराला निसर्गाची ताजगी देतात आणि वातावरण सुखद करतात.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; १३ वर्षं कोमात असलेल्या हरीश राणाच्या इच्छामरणाला मंजुरी

Mumbai : विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळली मोठी दुर्घटना

IRCTCचा महत्त्वाचा निर्णय; LPG टंचाईमुळे रेल्वे केटरिंगमध्ये इंडक्शन वापरण्याचे निर्देश

इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांना; वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम

LPG Saving Tips : गॅस बचतीसाठी Indian Oilचा सल्ला; 'या' टिप्स ठेवा लक्षात