Freepik
फोटो

तुळशीचे पाणी पिण्याचे 'हे' होतात फायदे; घरच्या वैद्याकडे करू नका दुर्लक्ष

Kkhushi Niramish
तुळस ही अतिशय बहुगुणी वनस्पती आहे. उत्तम आरोग्यासाठी तुळशी किती उपयुक्त आहे, याचे वर्णन आयुर्वेदात सविस्तर दिले आहे. दररोज सकाळी तुळशीचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊया...
कोरोनानंतर चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत सर्वजण जागरूक झाले आहेत. दररोज सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे तुमचा अनेक आजारांच्या संक्रमणापासून बचाव होतो.
सकाळी अनश्या पोटी तुळशीचे पाणी पिणे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असते. यामुळे सकाळी पोट साफ होते. तसेच पोटाचे विकार दूर होतात. शरिरातील घाण आणि विषारी द्रव्य बाहेर पडल्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
ताप, खोकला, सर्दी यासारख्या आजारांमध्ये तुळशीचे पाणी उत्तम औषध ठरते. तुळशीच्या पाण्यासोबतच तुम्ही तुळशीच्या पानांचा काढा सुद्धा घेऊ शकतात. यामुळे ताप लगेच बरा होतो. मलेरियासारख्या आजारांचा धोका कमी होतो.
तुम्हाला श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असल्यास जसे की, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास अडचणी तर तुळशीचे पाणी दररोज प्यावे. यामुळे असे आजार लवकर बरे होतात.
तुळशीचे पाणी हे मधुमेहावरही गुणकारी आहे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते.
पाण्यात तुळशीपत्र किमान एक तास आधी भिजत ठेवावे किंवा एक दिवस आधी संध्याकाळ होण्यापूर्वी तुळशीची पाने तोडून ठेवावी. ती रात्री एक ग्लास पाण्यात भिजत घालावी. हे पाणी सकाळी उठून प्यावे. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश! दिल्ली-NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना उचला, शेल्टरमध्ये सोडा; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा

Pune : कुंडेश्वर दर्शनाला जाताना काळाचा घाला; खचाखच भरलेली पिकअप व्हॅन रस्त्याच्या उतारावरून २५-३० फूट खाली कोसळली, ७ जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा! सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन; यंदा थेट महामार्गावरच गणेशोत्सव

वेगमर्यादेचे उल्लंघन! Mumbai Pune Expressway वर ४७० कोटींचे चलन जारी, मात्र...

गरज पडल्यास शस्त्रेही उचलू; जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा इशारा